ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची युती, राहुल गांधी म्हणाले, "काश्मीरला राज्याचा दर्जा..." - Jammu Kashmir Assembly Elections - JAMMU KASHMIR ASSEMBLY ELECTIONS

Jammu Kashmir Assembly Elections : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात युती झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची भेट घेतली.

Jammu Kashmir Assembly Elections
मलिकार्जून खर्गे,फारुख अब्दुल्ला, राहुल गांधी, ओमर अब्दुल्ला (Etv Bharat National Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 9:43 PM IST

श्रीनगर Jammu Kashmir Assembly Elections : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये युती करण्यावर एकमत झालंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांच्याशी श्रीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी तासभर बैठक घेतली.

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबरला तसंच शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे. त्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सची युती : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. जम्मू-काश्मीर निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी एकत्र येण्याबाबत विचारलं असता, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला म्हणाले, 'काँग्रेस आणि आम्ही (एनसी) एकत्र आहोत. तारिगामी साहेबसुद्धा (CPM M.Y. Tarigami) आमच्यासोबत आहेत. मला आशा आहे की, आमचे लोक आमच्यासोबत असतील."

जागांबाबतचा गेल्या आठवड्यात करार : श्रीनगरमध्ये त्यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी पोहोचले. पत्रकार परिषद संपल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे म्हणाले, "जम्मू-काश्मीरमध्ये युती मजबूत करणार आहोत. आम्ही काश्मीरला राज्याला दर्जा बहाल करणार आहोत." यावरून दोन्ही पक्षांमधील युती निश्चित झाल्याचं स्पष्ट झालंय. कारण दोन्ही पक्षांमधील जागांबाबतचा गेल्या आठवड्यातच करार संबंधित समित्यांनी केला होता. काही दिवसांतच याची घोषणा केली जाईल, असं सूत्रांनी सांगितलं.

काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याला प्राधान्य : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितलं की, "जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करणं, ही काँग्रेस तसंच इंडिया आघाडीचं सर्वोच्च प्राधान्य आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू,काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल केला जाईल, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे." श्रीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, "स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखादं राज्य केंद्रशासित प्रदेश बनलं आहे. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. आम्ही आमच्या राष्ट्रीय जाहीरनाम्यातही हेच स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांना त्यांचे लोकशाही हक्क परत मिळावेत, अशी आमची मागणी आहे."

मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत डिनर : राहुल गांधींनी कार्यकर्त्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. बुधवारी संध्याकाळी मल्लिकार्जुन खर्गेंसोबत राहुल गांधी यांनी वाझवानचा आनंद घेतला. मात्र, त्यांनी वाझवान खाल्लं नाही. खर्गेंना काही आरोग्याच्या समस्या आहेत. डॉक्टरांनी त्यांना 15 दिवस शाकाहारी जेवण घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळं ते वाझवानचा आनंद घेऊ शकले नाहीत.

काश्मिरी वाझवान म्हणजे काय? : काश्मिरी पाककृतीमध्ये वाझवानला खूप महत्व आहे. हे काश्मिरी संस्कृती, तसंच अस्मितेचं प्रतीक मानलं जातं. वाझवानचे जवळजवळ सर्व पदार्थ मांसापासून बनवले जातात. यामध्ये मेंढी किंवा कोंबडीचे मांस वापरलं जातं. हे जेवण संपूर्ण काश्मीरमध्ये लोकप्रिय आहे. हे विशेष सण किंवा विवाहसोहळ्यांसारख्या कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांना या जेवणाची खास मेजवानी दिली जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.