ETV Bharat / bharat

ईडीच्या चौकशीला अरविंद केजरावील आठव्यांदा गैरहजर, व्हिडिओ कॉन्फरन्सनं उपस्थित राहण्याची दाखविली तयारी - delhi budget 2024

delhi excise policy case: ईडीकडून सातत्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठविण्यात येत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सला उत्तर देत १२ मार्चनंतर तारीख मागितली आहे. तसचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ईडीला उत्तर देण्यास तयार असल्याचं पत्रातून सांगितलं.

cm arvind kejriwal
cm arvind kejriwal
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 2:12 PM IST

नवी दिल्ली- दिल्ली मद्यधोरणाच्या कथित घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ईडी कार्यालयात आज हजर झाले नाहीत. त्यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीला पत्र लिहून सविस्तर उत्तर दिलयं.

ईडीनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याकरिता समन्स बजावलं होतं. मात्र, पूर्वीप्रमाणं आजही केजरीवाल ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत. दिल्ली सरकारच्या अर्थमंत्री आतिशी यांनी आज १० वा अर्थसंकल्प सादर केला. दिल्ली सरकारकडून आज अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्यानं मुख्यमंत्री केजरीवाल आज अधिवेशनात हजर राहिले आहेत. दिल्लीचा अर्थसंकल्प हा २ कोटी लोकांच्या भविष्याशी निगडीत आहे. त्यामुळे न्यायालयानं केजरीवाल यांच म्हणणं ऐकून त्यांना १६ मार्चपर्यंत वेळ दिला होता. तरीही केजरीवाल यांना समन्स पाठवून त्रास दिला जात असल्याचा आरोप आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी यापूर्वी केला.

समन्स बेकायदेशीर असल्याची टीका- कथित मद्यधोरण घोटाळ्याबाबतचे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. त्यावर १६ मार्चला न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सप्रमाणं कार्यालयात आज हजेरी लावली नाही. ईडीनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ४ मार्च रोजी ईडी मुख्यालयात हजर राहण्याकरिता समन्स बजावलं होतं. त्यापूर्वी ईडीनं २१ फेब्रुवारीला मुख्यमंत्री केजरीवाल यांना समन्स बजावत ईडीच्या कार्यालयात २६ फेब्रुवारीला हजर राहण्याकरिता कळविलं होतं. दिल्ली सरकारच्या मद्यधोरणाचा आराखडा हा केजरीवाल यांच्या घरी केल्याचा तपास संस्थांचा आरोप आहे. त्यावरून चौकशी करत ईडीनं सर्वप्रथम गतवर्षी नोव्हेंबरमध्ये समन्स बजावलं होतं. हे समन्स बेकायदेशीर असल्याचं आपचे संस्थापक केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

फेब्रुवारीमध्ये टाकले होते छापे- ईडीनं ६ फेब्रुवारीला कथित मद्यधोरण घोटाळ्यात दिल्ली एनसीआरमध्ये डझनहून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. यामध्ये आम आदमी पक्षाचे खासदार तसेच मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या घरावही ईडीनं छापे टाकले. ईडीच्या कारवाईवरून आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी मोदी सरकावर टीका केली होत्या. त्या म्हणाल्या, हे केवळ धमकावण्यासाठी केलं जात आहे. ईडीविरोधात मोठा खुलासा करण्यापूर्वी ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा-

  1. "ईडीसह पीएमएलएचा कायदा रद्द केला तर अर्धे लोक...," -अरविंद केजरीवाल यांचा भाजपावर निशाणा
  2. अरविंद केजरीवालनंतर गुन्हे शाखेचे पथक पोहोचले आतिशींच्या घरी, आमदारांच्या घोडेबाजारप्रकरणी बजावणार नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.