नवी दिल्ली Delhi LG Vs Aap Govt Over City Civic Issues : देशाच्या राजधानीतील तेहखंड आणि ओखला इथल्या झोपडपट्टीत मोठं घाणीचं साम्राज्य आहे. त्याबाबतची छायाचित्र दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी सोशल माध्यमांवर टाकून सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळं नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.
नायब राज्यपालांनी सोशल माध्यमात पोस्ट केले फोटो : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी शुक्रवारी दिल्लीतील तेहखंड आणि ओखला इथल्या झोपडपट्टीला भेट दिली होती. यावेळी त्यांना तेहखंड आणि ओखला या दोन्ही झोपडपट्टीत मोठी घाण असल्याचं दिसून आलं. त्यामुळं नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी या घाणीच्या साम्राज्याचे फोटो काढून ते सोशल माध्यमांवर पोस्ट केले. यावेळी त्यांनी दिल्ली सरकारच्या सोशल माध्यमांना टॅग करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना याची दखल घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी "नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी पोस्ट केलेल्या फोटोची दखल घेऊन संबंधित विभागाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या," असं त्या पोस्टवर नमूद केलं.
नायब राज्यपालांमुळं तीन लाख नागरिक झाले बेघर : नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी सोशल माध्यमांवर घाणीचे फोटो पोस्ट केल्यानंतर मोठं राजकारण तापलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी शेयर केलेल्या पोस्टची दखल घेत त्यांना उत्तर दिलं. मात्र नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्यामुळं दिल्लीतील 3 लाख नागरिक बेघर झाल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. त्यामुळं दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे.
हेही वाचा :