कोलकाता Doctor Murder Rape Case : कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर करण्यात आलेल्या बलात्कार आणि खून प्रकरणानं देशभर खळबळ उ़डाली. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान नियुक्त करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे गुरुवारीच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात बेट दिली. त्यानंतर लगेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नियुक्त करण्यात आलं आहे.
#WATCH | West Bengal | CISF deployed on Kolkata's RG Kar Medical College and Hospital after Supreme Court order pic.twitter.com/TKwJ5hCuAl
— ANI (@ANI) August 23, 2024
सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला घेतलं फैलावर : सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि खून प्रकरणात सुनावणी घेतली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्य सरकारच्या वकिलांना चांगलंच फैलावर घेतलं. पश्चिम बंगाल सरकारच्या वतीनं भूमिका मांडताना वकिलांनी वेगवेगळी माहिती न्यायालयात देण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सरन्यायाधीशांनी खडे बोल सुनावत आमच्याकडं या घटनेतील शवविच्छेदन अहवाल असल्याचं स्पष्ट करत त्यांच्या माहितीतील हवाच काढून घेतली. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर या प्रकरणातउशीरानं गुन्हा दाखल करुन घेतल्यावर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयानं दिले सीआयएसएफ नियुक्तीचे निर्देश : आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत घृणास्पद आहे. या घटनेचा करावा तितका निषेध कमी आहे. त्यामुळे आरजी कार वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालयात तत्काळ सुरक्षेची उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यासाठी तत्काळ आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना नियुक्त करण्यात यावं, असे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर गेले. त्यानंतर आजपासून आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची सुरक्षा सीआयएसएफ जवानांच्या हातात सोपवण्यात आली.
हेही वाचा :
- कोलकाता डॉक्टर बलात्कार खून प्रकरण : सोशल माध्यमातील माहिती न्यायालयात सांगू नका, सरन्यायाधीश संतापले - Doctor Rape Murder Case
- सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकारला फटकारलं; डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी 'राष्ट्रीय टास्क फोर्स'ची नियुक्ती - Kolkata Doctor Murder Rape Case
- कोलकाता डॉक्टर बलात्कार खून प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं घेतली दखल, 'या' तारखेला होणार सुनावणी - Kolkata Doctor Rape Murder Case