ETV Bharat / bharat

अवैध लग्नातून जन्मलेल्या अपत्यांनाही मिळेल आई वडिलांच्या संपत्तीत वाटा, सर्वोच्च न्यायालयानं दिला 'हा' आदेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 11:03 AM IST

SC On Children Of Voidable Marriage : सर्वोच्च न्यायालयानं अवैध विवाहातून जन्मलेल्या अपत्यांना आई वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्याचा निकाल दिला आहे. त्यामुळं हिंदू विवाह कायद्याच्या कलम 16 ( 3 ) ची कक्ष रुंदावली आहे. याबाबातचा रिपोर्ट ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सुमित सक्सेना यांनी वृत्त दिलं आहे.

Supreme Court
Supreme Court

नवी दिल्ली SC On Children Of Voidable Marriage : अवैध विवाहातून जन्मलेल्या अपत्यांनाही आई वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानं याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळं अवैध विवाह जरी असला, तरी आई वडिलांच्या संपत्तीत अपत्यांना वाटा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं हिंदू मॅरेज अ‍ॅक्टच्या 16 ( 3 ) ची कक्षा रुंदावली आहे. तर अवैध विवाहातून जन्मलेल्या अपत्यांना या निर्णयानं दिलासा मिळाला आहे.

काय म्हणालं न्यायालय : न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि एस व्ही एन भट्टी यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. यावेळी निर्णय देताना खंडपीठ म्हणालं की, " केवळ कुटुंबातील कलहामुळं संपत्तीच्या वाट्यात कमी-जास्त प्रमाण होते. मात्र अवैध विवाहातून जन्मलेल्या अपत्यांनाही आई वडिलांच्या संपत्तीत अधिकार आहेत. न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि एस व्ही एन भट्टी यांच्या खंडपीठानं मुथ्थूस्वामी प्रकरणात सुनावणी घेताना हा निर्णय दिला. मुथ्थूस्वामी यांनी तीन लग्न केल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र त्यांचं 1982 मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपत्तीच्या वाट्यावरुन वाद उद्भवल्यानं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं.

मुथ्थूस्वामीची होती तीन लग्न : मुथ्थूस्वामी गौंडरनं तीन लग्न केली होती. त्यामुळं चिन्नमल आणि रमयी यांच्याशी विवाहाच्या वस्तुस्थितीवरुन पुराव्याच्या अभावामुळं दावा मान्य करण्यात आला नाही. मात्र न्यायालयानं रेकॉर्डवरील परिस्थितीतून दिलासा विचारात घेतला पाहिजे, असं खंडपीठानं स्पष्ट केलं. सुब्रमणी, अम्मासी अम्मल आणि मुथ्थूस्वामीची कायदेशीर पत्नी राजा गौंडर यांच्यात हा वाद आहे. यात मुथ्थूस्वामीची अपत्य अवैध विवाहातून जन्मली आहेत, असा दावा प्रतिवादीकडून करण्यात आला. मुथ्थूस्वामीची इतर दोन पत्नीची मुलं पुराव्याविना असल्यानं त्यांचा संपत्तीत वाटा नाकारण्यात आला होता. त्याला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल देत वरील निर्णय दिला आहे.

मुथ्थूस्वामीच्या निधनानंतर उद्भवला वाद : मुथ्थूस्वामी गौंडर यांनी तीन लग्न केली होती. मात्र यातील त्याची एकच पत्नी कायदेशीर होती. तर इतर दोन पत्नी या अवैध असल्याचं स्पष्ट झालं होतं. दरम्यान मुथ्थूस्वामी गौंडरचं 1982 मध्ये निधन झालं. त्यानंतर त्याच्या तीन पत्नीच्या वारसांमध्ये मुथ्थूस्वामीच्या संपत्तीवरुन वाद झाला. हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.