चाईबासा Police Naxalite Encounter : कोल्हानच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या विरोधात पोलिसांना मोठं यश मिळालंय. पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील गुवा पोलीस स्टेशन हद्दीतील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सोमवारी (17 जून) सकाळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचं मोठं नुकसान झालंय. या चकमकीत सुरक्षा दलांनी 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीच्या ठिकाणाहून नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना जवानांनी चार नक्षलवाद्यांना ठार केलं. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू असून काही नक्षलवाद्यांना गोळ्या लागल्याचीही माहिती आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिला घटनेला दुजोरा : पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी या चकमकीला दुजोरा दिला. यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी सांगितलं की, सोमवारी सकाळी शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले.
4 नक्षलवादी ठार, दोन जखमी : ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक झोनल कमांडर, एक सब-झोनल कमांडर, एक एरिया कमांडर, एक महिला आणि एका पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. दोन नक्षलवादी जखमी झाले असून त्यात एक एरिया कमांडर आणि एका कट्टर महिला नक्षलवादीचा समावेश आहे. तर एका महिला नक्षलवाद्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -
- अबुझमदमध्ये 8 नक्षलवादी ठार, 161 दिवसांत 141 माओवाद्यांचा खात्मा - Chhattisgarh Naxal Encounter Update
- छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 12 नक्षलवाद्यांचा खात्मा - encounter in pedia forests
- महाराष्ट्राच्या सीमेवर 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांमध्ये 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश - Naxal encounter in Abujhmad