ETV Bharat / bharat

महादेव बेंटींग अ‍ॅप प्रकरण ; आता सीबीआय करणार महादेव बेटींग प्रकरणाचा तपास, भूपेश बघेल यांच्या अडचणीत वाढ - Mahadev Online Betting App Case

Mahadev Online Betting App Case : महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणात भूपेश बघेल यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. आता मात्र राज्य सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडं सोपवलं आहे. त्यामुळे भूपेश बघेल यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Mahadev Online Betting App Case
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 7:38 PM IST

महादेव बेंटींग अ‍ॅप प्रकरण ; आता सीबीआय करणार महादेव बेटींग प्रकरणाचा तपास (ETV Bharat)

रायपूर Mahadev Online Betting App Case : महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणानं देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेत भूपेश बघेल यांना मोठा दणका दिला आहे. महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणाचा तपास आता राज्य सरकारनं सीबीआयकडं सोपवण्याची घोषणा केली आहे. महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडं सोपव सीबीआयकडून सोपवण्यात आली असून आता पुढील सगळी कारवाई सीबीआय करणार आहे. त्यामुळे हा भूपेश बघेल यांना मोठा धक्का मानला जात आहे.

महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणाचा तपास सीबीआयकडं : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरण सीबीआयकडं सोपवल्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी बोलताना गृहमंत्री विजय शर्मा म्हणाले की, छत्तीसगडच्या गृह मंत्रालयानं महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरण सीबीआयकडं सोपवल्याची अधिसूचना जारी केली आहे. महादेव अ‍ॅपची 70 प्रकरणं आहेत. सर्व प्रकरणं एका राज्यातून दुसऱ्या राज्याशी जोडली जात असल्याची चर्चा होती. महादेव अ‍ॅपशी संबंधित आरोपी परदेशात राहत असल्याचीही माहिती पुढं आली आहे.

ईडी करत आहे तपास : महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणाचा तपास आतापर्यंत ईडीनं करत 11 आरोपींना अटक केली. महादेव अ‍ॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची ईडी तब्बल 16 महिन्यांपासून चौकशी करत आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या काळात महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणातील आरोपीला संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात येत होता. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी, राजकारण्यांचा समावेश असल्याचा आरोप ईडीनं केला. ईडीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात तब्बल 6 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे.

1 हजार कोटींची गुंतवणूक : ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांच्या व्यतिरिक्त सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI देखील महादेव अ‍ॅपची चौकशी करत आहे. महादेव बेटिंग अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभम सोनी यांनी सट्टेबाजीचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेअर बाजारात 1000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याचं ईडीच्या आरोपपत्रात उघड झालं आहे. या प्रकरणाचा तपास सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडं ( सेबी ) आहे. या प्रकरणी ईओडब्ल्यूनं माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. आता महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणाचा तपास सीबीआयकडं गेल्यामुळे मात्र भूपेश बघेल यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा :

  1. Mahadev Betting App Case : महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरण; अभिनेता साहिल खानसह उद्योगपती मोहित बर्मनवर गुन्हा दाखल
  2. महादेव अ‍ॅप प्रकरणात असीम दासने पुन्हा फिरवली साक्ष; भूपेश बघेल यांनी 508 कोटी घेतल्याचा केला दावा
  3. Pravin Darekar On Bhupesh Baghel : भूपेश बघेल यांच्या सट्टेबाजांशी असलेल्या कनेक्शनचे काँग्रेसने उत्तर द्यावे; दरेकर यांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.