ETV Bharat / bharat

NEET पेपर लिक प्रकरण : सीबीआयनं धनबादमधून अमन सिंगला केलं अटक, आतापर्यंत चार जणांना ठोकल्या बेड्या - NEET Paper Leak Case - NEET PAPER LEAK CASE

NEET Paper Leak Case : नीट पेपर लिंक प्रकरणात सीबीआयनं गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. सीबीआयनं झारखंडमधील रवींद्र उर्फ अमन सिंग याला बेड्या ठोकल्या आहेत. अमन सिंग हा झारखंडमधील नीट पेपर लिक प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

NEET Paper Leak Case
सीबीआय कार्यालय (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 10:31 AM IST

रांची NEET Paper Leak Case : नीट पेपर लिक प्रकरणी लातूर कनेक्शन उघड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. मात्र नीट प्रकरणाचे धागेदोरे देशपातळीवर गुंतलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवण्यात आला. सीबीआयनं झारखंडमधील धनबादमध्ये NEET पेपर लिक प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. नीट पेपर लिक प्रकरणात सीबीआयनं रवींद्र उर्फ ​​अमन सिंगला अटक केली. अमन सिंग हा झारखंडमधील नीट पेपर लिक प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा करण्यात येत आहे.

नीट पेपर लिक प्रकरणाचं धनबाद कनेक्शन : नीट पेपर लिक प्रकणानं देशभरातील विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत. झारखंडमध्येही नीट पेपर लिक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. देवघर आणि हजारीबागनंतर NEET पेपर लीकचं कनेक्शन धनबादशी जोडलं गेल्याचं उघड झालं. त्यामुळे सीबीआयनं धनबादमध्ये छापे टाकले. दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या पथकानं धनबादच्या हाऊसिंग कॉलनीतील रवींद्र उर्फ ​​अमन याला अटक केली. सीबीआय टीमनं आरोपी अमन सिंगला धनबादच्या सरायदेला पोलीस स्टेशन हद्दीतील कार्मिक नगरमधील बापू नगरच्या बिंदू अपार्टमेंटमधून अटक केली. सीबीआयचे अधिकारी सध्या अमनची चौकशी करत आहेत.

सीबीआयनं केल्या प्रश्नपत्रिका जप्त : सीबीआयनं झारखंडमध्ये टाकलेल्या छाप्यात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सीबीआयच्या पथकानं देवघर इथ छापेमारी करुन प्रश्नपत्रिका जप्त केल्या. या प्रकरणाचं हजारीबाग प्रकरणाशी साधर्म असल्याचं सीबीआयच्या पथकाला आढळून आलं. त्यामुळे सीबीआयनं हजारीबागमध्ये कारवाई केली. ओएसिस शाळेच्या मुख्याध्यापकांची कसून चौकशी केल्यानंतर पथकानं मुख्याध्यापकाला अटक केली. या प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नीट पेपर लिक प्रकरणात झारखंडमधून 4 आरोपी जेरबंद : नीट पेपर लिक प्रकरणात लातूरच्या दोन जिल्हा परिषद शिक्षकांना अटक केल्यानंतर राज्यातही नीटमध्ये घोटाळा झाल्याचं उघड झालं. नीट पेपर लिक प्रकरण देशपातळीवर गाजलं. त्यानंतर नाट पेपर लिक प्रकरणाचा तपास सीबीआयकडं देण्यात आला. सीबीआयनं झारखंडमधून एकून आतापर्यंत 4 जणांना अटक केलं. सीबीआयनं हजारीबाग इथल्या जमालुद्दीन, ओएसिस शाळेचे प्राचार्य आणि उपप्राचार्य यांचा समावेश आहे. याशिवाय आता अमनला धनबादमधून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. नीट परीक्षेवरील लोकांचा विश्वास उडाला- अभिनेता थलपतीनं केंद्र सरकारला 'ही' केली विनंती - ACTOR VIJAY on NEET
  2. सीबीआय नीट पेपर फुटीतील मुख्य सूत्रधार इरान्ना कोंगुलवारच्या घराची घेणार झडती; हाती लागणार मोठं घबाड? - Latur NEEt Exam Scam
  3. लातूरच्या 'नीट' घोटाळ्याचा तपास सीबीआयकडं वर्ग, दोन आरोपी अजूनही फरार, कसून शोध सुरू - NEET Exam Scam

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.