अलप्पुझा (केरळ) Kerala BJP Leader Murder Case : मावेलिक्कारा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय-I चे न्यायाधीश श्रीदेवी व्ही.जी. यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते रणजित श्रीनिवास यांच्या हत्येप्रकरणी मंगळवारी (30 जानेवारी) 15 दोषींना शिक्षा सुनावली (Death Sentence 15 PFI Activists) आहे. या प्रकरणात सर्व 15 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि वकील असलेले रणजित श्रीनिवास (RSS leader Ranjith Sreenivas) यांची 19 डिसेंबर 2021 रोजी सकाळी अलाप्पुझा नगरपालिकेतील वेल्लाकिनार येथील राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली होती. दरम्यान, 20 जानेवारी 2024 रोजी या सर्व आरोपींना न्यायालयानं भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत दोषी ठरवलं होतं.
आरोपींची नावं : आरोपींमध्ये नैजम, अजमल, अनूप, मुहम्मद अस्लम, सलाम पोनाद, अब्दुल कलाम, सफ्रुदीन, मुनशाद, जसीब राजा, नवास, शेमीर, नसीर, झाकीर हुसेन, शाजी पूवाथुंगल आणि शमनस अश्रफ यांचा समावेश आहे. तसंच न्यायालयानं दोषींची मानसिक स्थिरता चाचणीही घेतलीय. त्यानंतर या सर्व आरोपींना न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे.
काय आहे प्रकरण? : भाजपाच्या ओबीसी विंगचे नेते रणजित श्रीनिवास यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी केरळमधील न्यायालयानं १५ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे सर्व आरोपी बंदी घालण्यात आलेल्या 'पीएफआय' या संघटनेशी संबंधित आहेत. 20 जानेवारीला या १५ जणांना न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 30 जानेवारीला त्यांना जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. हत्येच्या या घटनेमध्ये आठ आरोपी सहभागी होते. तर उर्वरित आरोपींना गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं होतं.
कधी केली होती हत्या? : केरळमधील भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे सचिव रणजित श्रीनिवास यांची १९ डिसेंबर २०२१ रोजी हत्या करण्यात आली होती. अलाप्पुझामध्ये आरोपींनी श्रीनिवास यांच्या घरामध्ये घुसून कुटुंबियांसमोर त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्या करणारे हे सर्व आरोपी 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' आणि 'सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया'चे सदस्य आहेत.
हेही वाचा -
- कोची युनिव्हर्सिटीतील कार्यक्रमात चेंगराचेंगरी; चौघांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी
- Case against Union Minister Rajeev Chandrasekhar : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर केरळ पोलिसांकडून गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण?
- Kerala Blast : केरळ बॉम्बस्फोटातील आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, केले अनेक खुलासे; जाणून घ्या का केले स्फोट?