हैदराबाद Buddhist Zen Meditation : दगदगीच्या जीवनात मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं फार महत्वाचं झालं आहे. कामाचा अतिरेक, सहकाऱ्यांशी वाद तसंच कामाच्या ठिकाणी असलेल्या खराब वातावरणमुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. परिणामी तणाव चिंता आणि नैराश्य येणं सहाजिक आहे. यावर उपाय म्हणून नियमित ध्यानाचा सराव केल्यास केवळ मानसिक आरोग्यच नाही तर शारीरिक आरोग्य देखील सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.
ध्यानाच्या फायद्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. आजकाल अनेक भारतीय आणि परदेशी पारंपारिक आणि आधुनिक पद्धतीनं ध्यान धारणा करतात. ज्यामध्ये झेन ध्यान पद्धती एक आहे. झेन ध्यान ही एक प्राचीन बौद्ध ध्यान पद्धती आहे. ही पद्धत १७ व्या शतकात तांग राजवंशाच्या काळात चीनमध्ये विकसित करण्यात आली. कालांतरानं कोरिया, जपान, तिबेट, नेपाळ आणि इतर जगात ही परसरली.
झेन मेडिटेशनचे फायदे : दक्षिण दिल्लीतील 'ईश ध्यान' केंद्रातील झाझेन ध्यान प्रशिक्षक एरिक लोबो म्हणतात की, झेन ध्यान ही एक प्राचीन बौद्ध ध्यान साधना आहे. ज्यामध्ये उघड्या डोळ्यांनी ध्यान केलं जातं. झेन ध्यान हे प्रामुख्यानं आरामात बसून आणि श्वासोच्छवासाचे नियंत्रण करताना केलेलं ध्यान आहे. जे मानसिक शांती,आत्म-जागरूकता आणि मानसिक संतुलन वाढवतं. लोबो यांच्या मते हे सजग ध्यानासारखंच आहे कारण त्यातही श्वास घेण्याचा आणि श्वास सोडण्याचा सराव मुख्यतः मोजणीसह केला जातो. हे उघड्या डोळ्यांनी केलं जात असल्यानं त्याचा नियमित सराव केल्यास आरोग्यविषयक अनेक फायदे होतात.
- मन शांत होते ज्यामुळे मानसिक स्पष्टता आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
- लक्ष आणि एकाग्रता सुधारते.
- तणाव आणि चिंता कमी होते.
- सेल्फ अवेअरनेस वाढतो.
- झोप सुधारते.
- भावनांचा समतोल साधून त्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आणि प्रतिक्रिया वाढते.
- नियमित ध्यान केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
- मनःस्थिती चांगली राहाते. त्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता.
- शरीराची ऊर्जा आणि कार्यक्षमताही वाढते.
झेन मेडिटेशन कसं करावं
- ध्यान करताना शांत जागा निवडावी. जेणेकरून ध्यान करताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.
- पूर्ण कमळ मुद्रा झेन ध्यानासाठी आदर्श मानली जाते. तुम्ही कमळ मुद्रेत बसू शकता. याशिवाय खुर्चीवर बसून देखील ध्यान करु शकता. ध्यानाची स्थिती कोणतीही असो, पाठीचा कणा अगदी सरळ असावा.
- ध्यान सुरू करताना डोळे किंचित खाली परंतु उघडे ठेवून नाकामार्फत श्वास घेणे सुरू करा.
- आपल्या श्वासोच्छवासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा आणि श्वास घेण्याच्या आणि बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेचा अनुभव घ्या.
- प्रत्येक श्वास मोजा, दहापर्यंत मोजल्यानंतर पुन्हा सुरुवातीपासून मोजणं सुरू करा.
- ध्यान करताना विचार येऊ द्या. परंतु त्या विचारांकडे जास्त लक्ष देण्याऐवजी, श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या गतीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा