ETV Bharat / bharat

बॉलिवूड अभिनेता साहिल खानला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी, काय आहे महादेव बेटिंग ॲप प्रकरण? - Mahadev Betting App Case - MAHADEV BETTING APP CASE

Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बॉलिवूड अभिनेता साहिल खानला अटक करण्यात आली आहे. साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याआधी छत्तीसगडच्या तपास यंत्रणांनी गोवा, दिल्लीतून दोघांना अटक केली होती.

Mahadev Betting App Case
Mahadev Betting App Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 10:55 PM IST

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बॉलिवूड अभिनेता साहिल खानला अटक

जगदलपूर/रायपूर/मुंबई Mahadev Betting App Case : मुंबई पोलिसांच्या सायबर सेल आणि एसआयटीनं महादेव बेटिंग ॲप प्रकरणात बॉलीवूड अभिनेता साहिल खानला जगदलपूर, छत्तीसगड येथून अटक केली. ही अटक शनिवारी रात्री जगदलपूर येथून करण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अन्य 32 जणांवरही गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी छत्तीसगडच्या ईओडब्ल्यूनं या प्रकरणी गोवा आणि दिल्लीतून दोघांना अटक केली होती. महादेव बेटिंग ॲपमधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा ईडी तपास करत आहे. या प्रकरणी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी साहिल खानला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

साहिल खान मुंबई कोर्टात हजर : साहिल खानला छत्तीसगडमधील जगदलपूर येथून मुंबईत आणण्यात आलं. रविवारी त्याला दादर कोर्टात हजर करण्यात आलं. मुंबई सायबर सेलच्या एसआयटीनं तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगत त्याच्याकडं 2 हजाराहून अधिक सिमकार्ड तसंच 1 हजार 700 बँक खात्यांचं तपशील जप्त केलं असल्याचं सांगितलं. या संपूर्ण प्रकरणात साहिल खाननं देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे.

त्यांना तपासासाठी रिमांड हवा होता. त्यांनी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात 2 हजार सिमकार्ड तसंच 1 हजार 700 बँक खाती असल्याची बाजू मांडली होती. कोर्टानं साहिल खानला 1 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्या नावावर कोणतंही सिम कार्ड किंवा बँक खाते नाही, "त्यानुसार, तो या ब्रँडची जाहिरात करत होता- वकील मुजाहिद अन्सारी, अभिनेता साहिल खान.

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात 32 जण रडारवर : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात एकूण 32 जण तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. ज्यामध्ये साहिल खानचाही समावेश आहे. या प्रकरणी मुंबईच्या माटुंगा पोलिसांचा दावा आहे की, या महादेव बेटिंग ॲपच्या घोटाळ्याचा आकार 15 हजार कोटींचा आहे. एफआयआरच्या आधारे माटुंगा पोलिसांनी हा दावा केला आहे.

मुंबई पोलीस साहिल खानच्या तपासात व्यस्त : मुंबई पोलीस साहिल खानच्या गॅझेटचीही चौकशी करत आहेत. याशिवाय या प्रकरणात साहिल खानसह अन्य 31 जणांची बँक खाती, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर वस्तूंचीही मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांनी साहिल खान आणि अन्य 31 जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हाही दाखल केला आहे. महादेव बेटिंग ॲपच्या प्रवर्तकांवर महाराष्ट्र पोलिसांची एसआयटी कारवाई करत आहे. एसआयटीला आर्थिक अनियमितता तसंच कथित अवैध व्यवहारांचा संशय आहे. महाराष्ट्राची एसआयटीही या प्रकरणात अनेक रिअल इस्टेट कंपन्यांच्या सहभागाचा तपास करत आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेला साहिल खान हा दुसरा व्यक्ती आहे.

कोण आहे अभिनेता साहिल खान : अभिनेता साहिल खानच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचं झालं, तर तो स्टाईल आणि एक्सक्यूज मी सारख्या सिनेमांद्वारे बॉलिवूडमध्ये प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्यानं इतर चित्रपटात फारसं काम केलं नाही. त्यानंतर साहिल खान फिटनेस एक्स्पर्ट झाला. मुंबई पोलिसांनी साहिल खानला अटक करण्यापूर्वी त्याची चौकशीही केली होती.

आतापर्यंत 9 जणांना अटक : छत्तीसगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB)/आर्थिक गुन्हे शाखेनं 24 एप्रिल रोजी महादेव बेटिंग ॲप प्रकरणात काही जणांना अटक केली होती. दोघांना दिल्ली आणि गोव्यातून अटक करण्यात आली. ज्यामध्ये राहुल वक्ते याला छत्तीसगडच्या तपास यंत्रणेनं दिल्लीतून अटक केली होती. तर रितेश यादवला गोव्यातून अटक करण्यात आली. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात छत्तीसगडच्या तपास यंत्रणांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे.

हे वाचलंत का :

  1. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात अटक केल्यावर अभिनेता साहिल खान म्हणाला,"मुंबई पोलिसांवर..." - Sahil Khan Arrested
  2. छत्तीसगढमध्ये लपलेल्या अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी केली अटक; 40 तास केला पाठलाग, पोलीस कोठडीत रवानगी - Mahadev Betting App case
  3. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मंगळवारी मुंबई पोलीस अभिनेता साहिल खानची करणार चौकशी - Mahadev betting app case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.