ETV Bharat / bharat

सात राज्यांतील 13 विधानसभा पोटनिवडणुकीत 'इंडिया आघाडी'चा विजय, 'भाजपा'ला जनतेनं दिला दणका - Assembly By Elections Result

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 7:49 PM IST

Updated : Jul 13, 2024, 9:36 PM IST

Assembly By Elections Result : 7 राज्यांमध्ये 13 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. 7 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल शनिवारी (13 जुलै) लागले. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या निकालात नेत्यांना जनतेनं चांगलाच दणका दिला. या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 5 जागा मिळाल्या असून, भाजपाला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला. पश्चिम बंगालमधील चारही जागा टीएमसीनं जिंकल्या आहेत. या निवडणुकीत इंडिया आघाडीनं बाजी मारल्याचं दिसून आलं.

Rahul Gandhi, Narendra Modi
राहुल गांधी, नरेंद्र मोदी (ETV Bharat MH Desk)

नवी दिल्ली Assembly By Elections Result : देशातील 13 विधानसभा जागांवर 10 जुलै रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला मोठा धक्का बसला असून इंडिया आघाडीनं मोठा विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीत 234 जागा जिंकणाऱ्या विरोधी इंडिया आघाडीनं पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. 7 राज्यांमध्ये 13 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांच्या उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या. यात पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड तसंच हिमाचल प्रदेश विधानसभेचा समावेश आहे.

पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर : 7 राज्यांतील 13 विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पोटनिवडणुकांमध्ये इंडिया आघाडीनं मुसंडी मारली आहे. त्याचवेळी या निवडणुकांमध्ये भाजपाच्या पदरी निराशाच पडली आहे. इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांनी 13 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसचे सर्वाधिक 5 उमेदवार विजयी झाले आहेत. तर, पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकांची विशेष बाब म्हणजे जनतेनं दलबदलू नेत्यांना धडा शिकवला आहे. यामध्ये भाजपाचे सर्वाधिक नुकसान झालं आहे. पंजाब, उत्तराखंडपासून हिमाचल प्रदेशपर्यंत पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर भाजपानं विश्वास व्यक्त केला होता. या निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची वाईट अवस्था झाली आहे.

कुठं झालं मतदान ? : रुपौली, रायगंज, बिहारमधील राणाघाट दक्षिण, पश्चिम बंगालमधील बागडा, माणिकतला, तामिळनाडूमधील विक्रवंडी, मध्य प्रदेशातील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ, मंगलोर, पंजाबमधील जालंधर पश्चिम, हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर, नालागडमध्ये पोटनिवडणुकीचं मतदान झालं.

उत्तराखंड : बद्रीनाथमध्ये बंडखोरांचा पराभव : उत्तराखंडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे बद्रीनाथ मतदारसंघातून काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला भाजपानं तिकीट दिलं होते. 2002 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेल्या राजेंद्रसिंह भंडारी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष बदलला होता . अशा स्थितीत पोटनिवडणुकीत भाजपाने भंडारी यांच्यावर विश्वास व्यक्त केला. मात्र, काँग्रेस फोडण्याची भाजपाची रणनीती प्रभावी ठरली नाही.

पंजाबमध्ये भाजपाची डाव फसला : बंडखोर नेत्याला तिकीट देण्याची भाजपाची खेळी पंजाबमध्ये चालली नाही. जालंधर पश्चिम येथील पोटनिवडणुकीत शीतल अंगुरल यांचा ३७ हजार मतांनी पराभव झाला. शीतल या आधी आम आदमी पक्षाच्या आमदार होत्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आप सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळं या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागली. पोटनिवडणुकीत भाजपानं शीतल अंगुराल यांनाच तिकीट दिलं होतं. मात्र, पक्षांतर करणाऱ्या अंगुराला जनतेनं धडा शिकवला. येथून आपचे उमेदवार मोहिंदर भगत विजयी झाले आहेत.

बिहारमध्ये बिमा भारतीचा पराभव झाला : लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये पक्ष बदलणाऱ्या विमा भारतीला रुपौली जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीतही पराभवाला सामोरे जावं लागलं. विमा भारती यांनी पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून आरजेडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. तिथंही त्यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत विमा भारतीचे प्रतिस्पर्धी असलेल्या पप्पू यादव यांनीही पोटनिवडणुकीत विमा भारतीला पाठिंबा दिला होता. यानंतरही जनतेनं पक्षांतर करणाऱ्या नेत्याचा झटका दाखवला. या मतदरासंघात एलजेपीचे नेते शंकर सिंह अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले आहेत .

हिमाचलमध्ये बंड पडलं महागात : हिमाचलमध्येही बंडखोर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. राज्यातील तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं दोन तर भाजपानं एक जागेवर विजय मिळवलाय. राज्यातील तीनही जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. यावेळी अपक्ष उमेदवार केएल ठाकूर यांनी भाजपाच्या तिकिटावर नालागड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचं भाजपामध्ये जाणं जनतेला आवडलं नाही. ठाकूर यांचा काँग्रेसचे उमेदवार हरदीप बाबा यांनी ९ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. राज्यातील देहरा मतदारसंघातही अपक्ष आमदाराने पक्ष बदलून भाजपामध्ये प्रवेश केला, मात्र त्यांनाही पराभव पत्कारावा लागला. येथून होशियार सिंग यांना मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या पत्नीकडून पराभव स्वीकारावा लागला.

हे वाचलंत का :

  1. ‘तेही आमच्यासोबत भाजपासारखेच वागले’; तर इंडिया आघाडीत राहायचं की नाही?...; कपिल पाटलांची पोस्ट चर्चेत - Kapil Patil On Mahavikas Aaghadi
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; विविध विकासकामांचं करणार लोकार्पण - PM Modi In Mumbai
  3. विधानपरिषदेत महायुतीचा दबदबा कायम; उबाठा गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी, तर शरद पवारांना धक्का - Maharashtra MLC Results 2024

Last Updated : Jul 13, 2024, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.