बांका (बिहार) Teacher Made The Children Swear : बिहारमधील एका शाळेत शिक्षिकेचं अनोखं प्रकरण समोर आलंय. अविश्वास दाखवून विद्यार्थ्यांकडं संशयानं पाहण्याचा आरोप एका महिला शिक्षिकेवर करण्यात आलाय. शाळेतील शिक्षिकेच्या पर्समधून फक्त 35 रुपये गायब झाल्याचं सांगत, तिनं सर्व विद्यार्थ्यांना घेऊन दुर्गा मंदिरात नेत त्यांना शपथ घ्यायला लावली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे पालक चांगलेच संतापले.
शिक्षिकेनं मुलांना द्यायला लावली शपथ : ही घटना 21 फेब्रुवारीला राजौन ब्लॉकच्या अस्मानीचक गावात असलेल्या एका शाळेत घडली. त्या शाळेत असलेल्या एका शिक्षिकेनं शाळेत पोहोचल्यावर तिच्या पर्समधून 35 रुपये गायब झाल्याचं समजलं. पुढं काय, शिक्षिका रागानं लाल झाली. शिक्षिकेला संतापलेलं पाहून शाळेतील इतर शिक्षक तिथं पोहोचले आणि त्यांनी विद्यार्थ्यांकडं पैशांबाबत विचारपूस केली. परंतु, पैसे विद्यार्थ्यांकडं सापडले नाहीत. मात्र, काही विद्यार्थ्यांनी तिचे पैसे चोरल्याचं शिक्षिका ठामपणे सांगत होती.
विद्यार्थ्यांचे तपासले खिसे : या शिक्षिकेनं शाळेत उपस्थित असलेल्या सर्व 105 विद्यार्थ्यांचे खिसे एक एक करुन तपासले. विद्यार्थ्यांडून पैसे न मिळाल्यानं शिक्षिकेनं त्यांना दुर्गा मंदिरात नेलं आणि सर्व विद्यार्थ्यांना शपथ घ्यायला लावली. त्यानंतर हा प्रकार मुलांच्या पालकांना समजताच मोठ्या संख्येनं पालक शाळेत पोहोचले आणि त्यांनी एकच गोंधळ घातला. यावेळी शाळेच्या आवारात अनेक तास हायव्होल्टेज ड्रामा सुरु होता.
शिक्षिकेचं हे वर्तन योग्य नाही, विद्यार्थ्यांवर संशय घेणं योग्य नाही, त्यामुळं शिक्षिकेची बदली करण्यात आलीय - कुमार पंकज, गट शिक्षणाधिकारी
महिला शिक्षिकेनं आरोपांवर काय म्हटलं? : बदलीनंतर तिच्यावर झालेल्या आरोपांवर महिला शिक्षिकेनं सांगितलं की, "माझ्या पर्समधून गायब झालेल्या पैशांबाबत मी सर्व मुलांना विचारलं होतं. मी मुलांना मंदिरात नेलं नाही, ते स्वत: मंदिरात शपथ घेण्यासाठी गेले होते. मी इथं वर्षानुवर्षे शिकवत आहे, माझ्यावर मुलांवर संशय घेण्याचा आरोप आहे, लोकांच्या या वागण्यानं मी दुखावली आहे."
हेही वाचा :