ETV Bharat / bharat

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही तासांतच घर सोडलं! जाणून घ्या लालकृष्ण अडवाणींचा 'भारतरत्न' बनण्याचा प्रवास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 2:04 PM IST

Lal Krishna Advani : भाजपाच्या स्थापनेपासून पक्षाचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. भाजपाच्या आजच्या यशात लालकृष्ण अडवाणींचा वाटा अत्यंत मोलाचा मानला जातो.

Lal Krishna Advani
Lal Krishna Advani

मुंबई Lal Krishna Advani : ज्येष्ठ भाजपा नेते आणि नव्वदच्या दशकात राम मंदिर रथयात्रेचं नेतृत्व करणारे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय. अशाप्रकारे केंद्रातील मोदी सरकारनं अनेक वर्ष भाजपाचा चेहरा राहिलेल्या या नेत्याचा सर्वोच्च गौरव केला.

पाकिस्तानात जन्म झाला : लालकृष्ण अडवाणी हे 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून सर्वात जास्त काळ पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतात झाला. त्यांनी कराचीच्या सेंट पॅट्रिक्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. युवा अवस्थेत देशभक्तीनं भारावलेल्या अडवाणींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे जाण्याची प्रेरणा दिली.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घर सोडलं : लालकृष्ण अडवाणींबाबत एक रोमहर्षक बाब म्हणजे, त्यांना 1947 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करता आला नाही, कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही तासांतच त्यांना आपलं घर सोडून भारतात यावं लागलं. मात्र, अडवाणींनी या घटनेचा स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही. देशाला एकसंध करण्याचा संकल्प मनात ठेवून ते राजस्थानमध्ये संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत राहिले. 1957 मध्ये अडवाणींना राजस्थान सोडून दिल्लीत येण्यास सांगण्यात आलं जेणेकरून ते अटलबिहारी वाजपेयी आणि नवनिर्वाचित खासदारांना मदत करू शकतील. दिल्लीतील एका कार्यालयात सुमारे 3 वर्षे काम केल्यानंतर, अडवाणींनी पत्रकार म्हणून नवीन अध्याय सुरू केला. 1960 मध्ये त्यांनी 'ऑर्गनायझर'मध्ये सहाय्यक संपादक म्हणून पदभार स्वीकारला.

भाजपाच्या यशात मोलाचा वाटा : 1980 ते 1990 या काळात अडवाणींनी आपलं सर्व लक्ष भाजपाला राष्ट्रीय पक्ष बनवण्याकडे केंद्रित केलं. त्याचा परिणाम तेव्हा दिसून आला, जेव्हा 1984 मध्ये केवळ 2 जागा जिंकणाऱ्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत 86 जागा मिळाल्या. ही त्यावेळच्या पक्षाच्या परिस्थितीनुसार खूपच चांगली कामगिरी होती. भाजपा 1992 मध्ये 121 आणि 1996 मध्ये 161 पर्यंत पोहोचला. याचा परिणाम असा झाला की, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पहिल्यांदाच सत्तेतून बाहेर पडली आणि भाजपा सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष म्हणून उदयास आला. म्हणूनच आजच्या भाजपाच्या यशात लालकृष्ण अडवाणींचा वाटा अत्यंत मोलाचा मानला जातो.

हे वाचलंत का :

  1. 'भारतरत्न' लालकृष्ण अडवाणी! भाजपाच्या 'भीष्माचार्यां'ना रथयात्रा पावली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.