कोलकाता Doctor Murder Case : कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेजमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणानंतर पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं आहे . या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं 'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन'ने 12 ऑगस्टपासून संपूर्ण देशात संपाची घोषणा केली आहे. सर्व सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टर संघटनांना संपात सहभागी होण्याचं संघटनेनं आवाहन केलं आहे.
#WATCH | West Bengal: Junior doctors at Kolkata's RG Kar Medical College and Hospital protest over the sexual assault and murder of a woman post-graduate trainee (PGT) doctor at the hospital, on August 9. pic.twitter.com/OEFrgBgcvr
— ANI (@ANI) August 11, 2024
निवासी डॉक्टरांच्या संपाच्या कालावधीत ओपीडी, इलेक्टिव्ह सर्जरी आणि लॅबमधील काम बंद ठेवण्यात येणार आहे. आरडीएनंही डॉक्टरांना संपावर जाण्याची नोटीस दिली आहे. आरजी मेडिकल कॉलेजचे कनिष्ठ डॉक्टरही पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी सातत्यानं आंदोलन करत आहेत.
The Federation of Resident Doctors Association (FORDA) announces nationwide halting of elective services in hospitals in solidarity with RG Kar Medical College residents tomorrow. A post-graduate trainee doctor was found dead after she was allegedly raped at #RGKARmedical and… pic.twitter.com/XW7bkwu4QU
— All India Radio News (@airnewsalerts) August 11, 2024
एका व्यक्तीला अटक : याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव संजय रॉय असं आहे. मात्र, या गुन्ह्यात अनेक जणांचा समावेश असू शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
#WATCH | West Bengal: Junior doctors at Kolkata's RG Kar Medical College and Hospital protest over the sexual assault and murder of a woman post-graduate trainee (PGT) doctor at the hospital, on August 9. pic.twitter.com/OEFrgBgcvr
— ANI (@ANI) August 11, 2024
- वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांना पदावरुन हटवलं : पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागानं आरजी कर मेडिकल कॉलेजचे अधीक्षक डॉ. संजय वशिष्ठ यांना हटविण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर निवासी डॉक्टरांनी महाविद्यालयाच्या अधीक्षकांना हटवण्याची मागणी केली होती.
ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. "पीडितेच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्यास आपण त्यांना पाठिंबा देऊ." असं त्या म्हणाल्या. त्याचवेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राज्य सरकारला याप्रकरणी तातडीनं कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण केंद्र सरकारकडे मांडणार असल्याचंही राज्यपालांनी म्हटलं.
आयएमएचा 48 तासांचा अल्टिमेटम : इंडियन मेडिकल असोसिएशनने या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी आयएमनं पोलिसांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तसं न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेनं दिला.
हेही वाचा
- किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, अनंतनागमध्ये दोन जवान हुतात्मा - Anantnag encounter updates
- घोटाळ्याची चौकशी करणारी संस्थाच फुटली? 'हिंडेनबर्ग'च्या आरोपांना अदानी समूहानं दिलं उत्तर - Adani Group On Hindenburg Research
- दिल्ली दारू घोटाळा ; तब्बल 17 महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार मनीष सिसोदिया, सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केला जामीन - SC Grants Bail To Manish Sisodia