कुर्नूल Attack on Eenadu Local Office in Kurnool : पनयमचे आमदार कटासनी रामभूपाल रेड्डी यांच्या समर्थकांनी कुर्नूल 'ईनाडू' स्थानिक कार्यालयावर हल्ला केला. वायएसआरसीपी आमदाराबाबत छापण्यात आलेल्या बातमीचा त्यांना राग आला. त्यामुळे त्यांनी हा हल्ला केल्याचं बोललं जातंय. या हल्ल्यात 500 हून अधिक समर्थक सहभागी होते. त्यांनी कार्यालयावर दगडफेक केली. एवढेच नव्हे तर संतापलेल्या समर्थकांनी कार्यालयातील फर्निचरची नासधूस झाली. तसंच यावेळी आमदारांच्या समर्थकांनी 'जय जगन, जय कटासनी' च्या घोषणाही दिल्या. वायएसआरसीपी समर्थकांनी यावेळी 'ईनाडू'च्या प्रतीही जाळल्या.
कार्यालयावर करण्यात आली दगडफेक : मंगळवारी (20 फेब्रुवारी) वायएसआरसीपीचे कार्यकर्ते आणि समर्थक 'ईनाडू' वृत्तपत्राच्या स्थानिक कार्यालयाबाहेर जमले. त्यांनी अचानक जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येनं जमलेल्या समर्थकांनी यावेळी पनयमचे आमदार कटासनी रामभूपाल रेड्डी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसंच यावेळी वृत्तपत्र कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. आमदाराच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याच्या निषधार्थ अशी तोडफोड करण्यात आल्याच्या चर्चा आहेत.
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरही तोडफोड सुरूच : तोडफोड करतांना आमदार विरोधी बातम्या का प्रसिद्ध केल्या जातात? असा प्रश्न या समर्थकांकडून करण्यात येत होता. त्यानंतर याठिकाणी गोंधळ वाढत असल्याचं पाहून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी बराच वेळ या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीतही घोषणाबाजी आणि तोडफोड सुरूच असल्याचं पहायला मिळालं. या प्रकारानंतर आंध्र प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकशाहीचा स्तंभ असलेल्या माध्यमांवर हल्ला होत असल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
हेही वाचा -