ETV Bharat / bharat

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर : 30 जिल्ह्यांमध्ये 24 लाख नागरिकांना पुराचा फटका; 120 हून अधिक प्राण्यांचा मृत्यू - Assam flood situation

Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर असून 30 जिल्ह्यांतील 24 लाख लोकांना पराचा फटका बसला आहे. यावर्षी पुरामुळं 52 जणांना जीव गमवावा लागला असून आत्तापर्यंत 120 हून अधिक मुक्या प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 4:43 PM IST

Assam Flood
आसाम पूरस्थिती (source : Social Media)

गुवाहाटी Assam Flood : आसाममधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. 30 जिल्ह्यांतील 24.50 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. यावर्षी पुरामुळं 52 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर भूस्खलनामुळं 12 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी बोलून राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला.

"मुसळधार पावसामुळं आसाममध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांच्याशी सध्याच्या परिस्थितीबद्दल बोललो. एनडीआरएफ, एसडीआरएफ युद्धपातळीवर काम करत आहेत - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा परिस्थितीचा आढावा घेतला : एनडीआरएफ, एसडीआरएफचं युद्धपातळीवर काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं शाह यांनी म्हटलं आहे. या आव्हानात्मक काळात राज्याला सर्वतोपरी मदत करण्यास केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. पूरग्रस्त दिब्रुगडहून परतल्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी रात्री उशिरा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरस्थितीचा आढावा घेतला.

"आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. महापुरात अडकलेल्या आमच्या बंधू-भगिनींसोबत माझा पक्ष ताकदीनं फभा आहे. मी केंद्रांसह, राज्य सरकारांला बाधित झालेल्यांना सर्व मदत देण्याचं आवाहन करतोय". - राहुल गांधी विरोधी पक्षनेते

राष्ट्रीय उद्यानात अनेक प्राणी मरण पावले : काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात शुक्रवारपर्यंत एकूण 120 वन्य प्राण्यांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर ज्योतीनगर परिसरातून 95 इतर प्राण्यांना वाचवण्यात आलं आहे. गुवाहाटी येथे गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या मुलाचा अद्याप, शोध लागलेला नाही. तो त्याच्या वडिलांच्या स्कूटरवरून घसरून उघड्या नाल्यात पडला होता. मुलाचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप यश मिळालेलं नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.