ETV Bharat / bharat

आम्हाला अटक कराल, आमच्या विचारांना कशी करणार अटक ? अरविंद केजरीवालांचा पोलिसांना सवाल - KEJRIWAL PROTEST BJP HEADQUARTER - KEJRIWAL PROTEST BJP HEADQUARTER

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयासमोर निदर्शन करण्याची घोषणा केल्यानंतर रविवारी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पक्ष कार्यालयात जमले. मात्र, दोन्ही कार्यालयांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून मोर्चा सुरु केल्यानंतर त्यांना आप कार्यालयापासून पुढं जाण्यास मज्जाव करण्यात आला आणि तिथंच थांबवण्यात आलं.

केजरीवालांना भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यास पोलिसांनी नाकारलं; आम्हाला अटक कराल आमच्या विचारांना अटक कशी करणार? केजरीवालांची टीका
केजरीवालांना भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यास पोलिसांनी नाकारलं; आम्हाला अटक कराल आमच्या विचारांना अटक कशी करणार? केजरीवालांची टीका (Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 7:15 PM IST

नवी दिल्ली Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या दिल्ली कार्यालयासमोर निदर्शन करण्याची घोषणा केली. मात्र या निदर्शनाला दिल्ली पोलिसांनी कोणतीही परवानगी दिली नव्हती, त्यामुळं मोठा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण निदर्शन काही वेळातच संपलं, दिल्ली पोलिसांनी आपच्या नेत्यांना रोखताच ते परत गेले परिणामी कोणत्याही प्रकारचा संघर्ष झाला नाही. मात्र यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सत्ताधाऱ्यांवर मोठा हल्लाबोल केला.

कडेकोट सुरक्षेमुळं 'आप'चे नेते पुढं जाऊ शकले नाही : निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा मुख्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली होती. तसंच आसपासच्या अनेक भागातही सुरक्षा अधिक मजबूत असल्याचं दिसून आलं. आम आदमी पार्टीनं कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळं त्यांना तिथं येण्याची परवानगी देता येणार नाही, असं पोलीस वारंवार सांगत होते. दुसरीकडं आम आदमी पार्टी पूर्णपणे आक्रमक पद्धतीनं भाजपा कार्यालयाकडं कूच करत होती.

केजरीवालांचं आव्हान : यादरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी सांगितलं की, "पंतप्रधान मोदींनी 'झाडू' ऑपरेशन सुरु केलंय. ज्या अंतर्गत त्यांना आम आदमी पार्टीला संपवायचं आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी आमच्या नेत्यांना अटक करण्यास सुरुवात केली. त्यांनी मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना अटक केली, काल त्यांनी माझ्या पीएलाही अटक केली. मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो, की तुम्ही एक एक करुन अटक करत आहात, आज आम्ही सगळे एकत्र येत आहोत, आम्ही तुम्हाला घाबरणार नाही."

विचाराला अटक कशी करणार : यावेळी पुढं बोलताना केजरीवाल म्हणाले की, "भाजपाला असं वाटतं की अशा प्रकारे ते 'आप'ला नष्ट करतील. मला त्यांना सांगायचं आहे की, 'आप' हा काही मोजक्या लोकांचा पक्ष नाही. 'आप' हा 140 कोटी लोकांची ड्रीम पार्टी आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम्ही जे काम केलंय, ते या देशातील जनतेनं 75 वर्षांत कधीच पाहिलं नाही. आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकारी शाळांची दुरुस्ती सुरु केली, गरीब मुलांना चांगलं शिक्षण मिळू लागलं. पंतप्रधान मोदींना हे जमत नव्हतं, म्हणून त्यांनी याला थांबवून अटक करण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही महिलांना हजारो रुपये देणार आहोत. तुम्ही त्यांच्या नेत्यांना अटक कराल, पण त्यांच्या विचारांना अटक कशी करणार?," असा सवालही यावेळी केजरीवाल यांनी केला.

हेही वाचा :

  1. काश्मीरमध्ये मतदानापूर्वी दोन दहशतवादी हल्ले, एका हल्ल्यात माजी सरंपच जखमी, दुसऱ्या हल्ल्यात जोडपे जखमी - terrorist attacks in Kashmir

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.