ETV Bharat / bharat

बालटाल, पहलगामला जोरदार पाऊस: मुसळधार पावसाचा अमरनाथ यात्रेला फटका - Amarnath Yatra Suspended - AMARNATH YATRA SUSPENDED

Amarnath Yatra Suspended : मुसळधार पावसाचा फटका अमरनाथ यात्रेला बसला आहे. त्यामुळे बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरील यात्रा थांबवण्यात आली. अमरनाथ यात्रेतील बालटाल मार्गावर तातडीनं दुरुस्ती करण्याची गरज असल्याचं विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी स्पष्ट केलं.

Amarnath Yatra Suspended
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 11:11 AM IST

श्रीनगर Amarnath Yatra Suspended : मुसळधार पावसाचा अमरनाथ यात्रेला मोठा फटका बसला आहे. बालटाल आणि पहलगाम इथं झालेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात आली आहे. गंदरबल जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बालटाल आणि पहलगाम इथल्या आमरनाथ यात्रेत मोठा अडथळा आला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी पुढील आदेश येईपर्यंत अमरनाथ यात्रा थांबवण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं.

मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित : बालटाल मार्गावर मुसळधार पाऊस झाला आहे. बालटाल आणि पहलगाममध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा सोमवारी स्थगित राहणार आहे. पहलगाम मार्गावरील यात्रा शनिवारी स्थगित करण्यात आली, अशी माहिती काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी दिली. अमरनाथ यात्रा परिसरात रविवारी पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवर मुसळधार पाऊस झाला. या मार्गाची तातडीनं देखभाल करणं आवश्यक आहे, असं यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बालटाल मार्गावर तातडीनं दुरुस्ती करणं गरजेचं : "मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा मार्गाच्या बालटाल आणि पहलगाम मार्गावर तातडीची दुरुस्ती आणि देखभालीची कामं हाती घेणं आवश्यक आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सोमवारपासून अमरनाथ यात्रेला परवानगी दिली जाणार नाही. बालटाल मार्गावर यात्रा स्थगित करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेबाबतची अपडेट माहिती योग्य वेळी जारी केली जाईल," असं काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी एका निवेदनात स्पष्ट केलं आहे.

19 ऑगस्ट संपणार अमरनाथ यात्रा : "अमरनाथ यात्रेच्या पहलगाम मार्गावर आवश्यक दुरुस्ती आणि देखभालीची कामं आधीच केली जात आहेत. पहलगाम मार्गावरील देखभालीच्या कामामुळे शनिवारी जम्मू जिल्ह्यातून यात्रेकरूंच्या तुकडीला काश्मीर खोऱ्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही," असं विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी स्पष्ट केलं. अमरनाथ यात्रा 29 जूनला सुरू झाली असून 19 ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल. तब्बल 52 दिवस अमरनाथ यात्रा चालणार आहे. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू जिल्ह्यातील भगवती नगर यात्री निवास इथून अमरनाथ यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.

हेही वाचा :

  1. Sai pallavi : साऊथ अभिनेत्री साई पल्लवीने आई-वडिलांसोबत अमरनाथ यात्रा केली पूर्ण; शेअर केला अनुभव...
  2. Sara Ali Khan : सारा अली खानची अमरनाथ यात्रा, पाहा व्हिडिओ
  3. Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नांदेड येथील 'ते' १८ भाविक आर्मी कॅम्प येथे सुरक्षित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.