मुंबई Assembly Elections Schedule 2024 : निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीसह काही राज्यात 26 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूकही होणार आहे.
चार राज्यांच्या विधानसभा निवडणूका जाहीर : लोकसभेबरोबरच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. याअंतर्गत 19 एप्रिलला अरुणाचल प्रदेशच्या 60, सिक्कीमच्या 32 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे 13 मे रोजी आंध्र प्रदेशच्या 175, ओडिशाच्या 147 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालासोबत या राज्यांचे निकालही जाहीर केले जातील.
एकाच वेळी विधानसभा निवडणुकांची घोषणा : सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश तसंच आंध्र प्रदेशमध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकांची अधिसूचना 16 एप्रिलला जारी होणार असून 13 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसंच 20 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशात अधिसूचना प्रसिद्ध होणार असून 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सिक्कीममध्ये 20 मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तसंच 19 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ओडिशात अधिसूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार असून मतदान 13 तारखेला होईल. तसंच दुसरी अधिसूचना 28 एप्रिल रोजी निघेल.
लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक : निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 102 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 89 जागांवर, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 94 जागांवर मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात 96 जागांवर, 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 49 जागांवर, 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 57 जागांवर, सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 57 जागांवर 1 जून रोजी मतदान होणार आहे.
पहिला टप्पा :
मतदान : 19 एप्रिल
राज्य : 21
लोकसभेच्या जागा : 102
दुसरा टप्पा :
मतदान : 26 एप्रिल
राज्य : 13
लोकसभेच्या जागा : 89
तिसरा टप्पा :
मतदान : 7 मे
राज्य : 12
लोकसभेच्या जागा : 94
चौथा टप्पा :
मतदान : 13 मे
राज्य : १०
लोकसभेच्या जागा : 96
पाचवा टप्पा :
मतदान : 20 मे
राज्य : 8
लोकसभेच्या जागा : ४९
सहावा टप्पा :
मतदान : 25 मे
राज्य : 7
लोकसभेच्या जागा : 57
सातवा टप्पा :
मतदान : 1 जून
राज्य : 8
लोकसभेच्या जागा : 57
निकाल : 4 जून 2024
हे वाचलंत का :
- Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; देशात सात टप्प्यात मतदान, 4 जून रोजी निकाल
- लोकसभा निवडणूक जाहीर, देशात आचारसंहिता लागू; जाणून घ्या आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?
- Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत 17 निर्णय; सगेसोयरे व्याख्येबाबत चार महिन्यात कार्यवाही करणार - मुख्यमंत्री