AP Singh New Air Force chief : भारत सरकारनं एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती केलीय. सध्या ते हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. अमरप्रीत सिंग 30 सप्टेंबर 2024 च्या दुपारपासून एअर चीफ मार्शल पदाची जबाबदारी स्वीकारतील आणि 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणारे एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांची ते जागा घेतील.
Air Marshal Amar Preet Singh has been appointed as the next Chief of the Air Staff.
— ANI (@ANI) September 21, 2024
Air Marshal Amar Preet Singh, is presently serving as Vice Chief of the Air Staff, as the next Chief of the Air Staff, in the rank of Air Chief Marshal, with effect from the afternoon of… pic.twitter.com/YX9Jz03Z9b
कोण आहेत अमरप्रीत सिंग? : एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1964 रोजी झाला. 1 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांची हवाई दलाचे 47वे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. एअर मार्शल सिंग यांनी 1984 मध्ये हवाई दलात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अमर प्रीत सिंग 21 डिसेंबर 1984 रोजी एअर फोर्स अकादमी डुंडीगल येथून भारतीय हवाई दलात नियुक्त झाले. त्यांनी इस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई अधिकारी म्हणून काम केलं, त्यानंतर त्यांनी सेंट्रल एअर कमांडचंही नेतृत्व केलं.
अमरप्रीत सिंग यांनी आपल्या कारकिर्दीत फ्लाइट कमांडर, मिग-27 स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर तसंच एअर बेसचे एअर ऑफिसर कमांडिंग अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. नॅशनल फ्लाइट टेस्ट सेंटरमध्ये अमरप्रीत सिंग प्रोजेक्ट डायरेक्टरही होते. त्यांच्याकडे तेजस लढाऊ विमानाच्या उड्डाण चाचणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अमरप्रीत सिंग यांच्याकडे 5,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. अमरप्रीत सिंग यांनी नॅशनल डिफेन्स अकादमी खडकवासला आणि एअर फोर्स अकादमी डुंडीगल येथून प्रशिक्षण घेतलं. ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टनचे माजी विद्यार्थी आहेत.
59व्या वर्षी चालवलं 'तेजस' विमान : अमरप्रीत सिंग यांनी वयाच्या 59 व्या वर्षी तेजस विमान चालवलं होतं. अमरप्रीत सिंग यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलंय. 2019 मध्ये त्यांना 'विशिष्ठ सेवा पदक' तर 2023 मध्ये 'परम विशिष्ट सेवा पदक' प्रदान करण्यात आलं.
हेही वाचा
- बीएसएफ जवानांची बस दरीत कोसळली; चार जवानांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक - BSF Bus Accident in Budgam
- लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढल्या : गृहमंत्रालयानं दिली सीबीआयला खटला चालवण्यास परवानगी - Lalu Prasad Yadav Laand For Job
- घरातली माणसं पडली आजारी; जादूटोणा करत असल्याच्या संशयातून मुलासह सुनेला जोरदार मारहाण - BEATING ON WITCHCRAFT