जयपूर Agniveer Soldier Gangraped A Girl : एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अग्निवीर जवानाला अटक करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. भावेश जाट असं या अग्निवीर जवानाचं नाव आहे. या अग्निवीर जवानानं अल्पवयीनं तरुणीला रात्री घराच्या बाहेर बोलावून बाईकवर जंगलात नेलं. मात्र या ठिकाणी दबा धरुन बसलेल्या त्याच्या मित्रांनी आणि त्यानं मिळून तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेनं कुटुंबीयांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेतील मुख्य आरोपी भावेश हा अग्निवीर जवान अशून तो उत्तराखंडमध्ये तैनात होता. सामूहिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर भावेश हा सैन्यात हजर झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून गुरुवारी न्यायालयात हजर केलं असता, त्याला 14 दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली.
अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलैला पीडितेनं अलवर जिल्ह्यातील कठुमर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीत पीडितेनं अग्निवीर जवान भावेशनं तिला रात्री घरातून बोलावून बाईकवर जंगलात नेलं. यावेळी त्याचे मित्र तिथं आधीच हजर होते. सर्वांनी मिळून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी भावेश हा पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांवर तडजोड करण्यासाठी दबाव आणत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला तत्काळ अटक केली. मात्र मुख्य आरोपी भावेश जाट हा फरार झाला.
भावेशला उत्तराखंडमधून ठोकल्या बेड्या : भावेश हा अग्निवीर सैनिक असून तो नुकताच अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल झाला, याबाबतची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. अलवर सामूहिक अत्याचार प्रकरणात भावेश हा मुख्य आरोपी आहे. भावेशनंच पीडितेला फोन केला. तो पीडितेशी फोनवर बोलत असल्याचंही तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी सैन्य दलाशी संपर्क साधून भावेशला उत्तराखंडमधून अटक केली. कठुमारचे पोलीस अधीक्षक जोगेंद्र सिंह यांनी सांगितलं की, सामूहिक बलात्काराची ही घटना 14 जुलैला घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सैन्य दलाच्या मदतीनं आरोपी भावेशला अटक करुन आणण्यात आलं. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आलं, असून न्यायालयानं त्याला कोठडी ठोठावण्यात आली आहे.
सैन्य दलाच्या मदतीनं पकडला गेला भावेश : अलवरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा म्हणाले की, "या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीनं भावेशला पकडण्यात आलं. भावेशला उत्तराखंडमध्ये सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी पकडलं. सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर तो आपल्या कर्तव्यासाठी गेला. भावेशला अटक करण्यासाठी अलवर पोलिसांनी उत्तराखंड गाठून त्याला अटक केली. या प्रकरणाचा अहवाल सैन्य दलाला पाठवला जाईल. त्यानंतर भावेशवर सैन्य दलाकडून कारवाई केली जाईल. लवकरच या प्रकरणातील अन्य आरोपींनाही अटक करण्यात येईल." सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पीडितेनं मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना पत्र पाठवलं आहे. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची विनंती पीडितेनं केली.
हेही वाचा :