ETV Bharat / bharat

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; 'गोबी मंचुरियन' आणि 'कॉटन कँडी' नंतर आता कबाबमध्ये कृत्रिम रंगांवर बंदी! - Artificial Colors In Kebabs

Artificial Colours Bans In Kebabs : कर्नाटक सरकारनं राज्यात कबाबमध्ये (शाकाहारी आणि मांसाहारी) कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या पदार्थांच्या नमुन्यांवरील गुणवत्तेच्या तपासणीत, कृत्रिम रंगांमुळं त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचं आढळून आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलय.

After Gobi Manchurian and Cotton Candy Karnataka Government bans artificial colours in Kebabs
कबाबमध्ये कृत्रिम रंग वापरण्यावर कर्नाटक सरकारची बंदी (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 12:21 PM IST

Updated : Jun 25, 2024, 1:04 PM IST

बंगळुरू Artificial Colours Bans In Kebabs : 'गोबी मंचुरियन' आणि 'कॉटन कँडी' नंतर कर्नाटक सरकारनं आता संपूर्ण राज्यभर कबाब (शाकाहारी आणि मांसाहारी) तयार करताना कृत्रिम कलरिंग एजंट वापरण्यास बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा विभागानं केलेल्या तपासणीत विविध ठिकाणच्या कबाबच्या 39 नमुन्यांपैकी 8 नमुन्यांमध्ये सनसेट यलो आणि एकामध्ये सनसेट यलोसह कार्मोइसिन आढळून आल्यावर हा निर्णय घेण्यात आलाय.

फूड सेफ्टी अँड क्लॉलिटी विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यभरात विकल्या जाणाऱ्या कबाबचा दर्जा कृत्रिम रंगांमुळं निकृष्ट असल्याचं आढळून आलं. त्यामुळं जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. राज्यभरात विकल्या जाणाऱ्या कबाबचे नमुने गोळा करून राज्य प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आले. 21 जून रोजी दिलेल्या अधिकृत आदेशात विभागानं असं नमूद केलं होतं की, प्रयोगशाळांमध्ये गोळा केलेल्या आणि चाचणी केलेल्या 39 नमुन्यांपैकी आठ नमुन्यांमध्ये कृत्रिम रंगाच्या वापरामुळं असुरक्षित असल्याचं आढळलं.

आदेशात काय म्हटलंय : फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट, 2006 चा हवाला देऊन, कृत्रिम रंगांचा वापर असुरक्षित आहे आणि त्यामुळे अशा रंगांचा ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स (फूड प्रॉडक्ट्स स्टँडर्ड्स अँड फूड ॲडिटीव्ह) रेग्युलेशन, 2011 च्या नियम 16 ​​अंतर्गत कबाब तयार करताना कोणत्याही कृत्रिम रंगांचा वापर करण्यास परवानगी नाही, असं आदेशात नमूद करण्यात आलय. तसंच या नियमांचं उल्लंघन केल्यास किमान सात वर्षांच्या तुरुंगवासापासून ते जन्मठेपेपर्यंत आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडापर्यंत कठोर शिक्षा होऊ शकते.

यापूर्वी 'या' पदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी : मार्चमध्ये, राज्य सरकारनं गोबी मंचुरियन आणि कॉटन कँडीमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास मनाई केली कारण त्यांच्या वापरामुळे सार्वजनिक आरोग्यावर, विशेषत: लहान मुलांवर विपरीत परिणाम होतो. गोबी मंचुरियन आणि कॉटन कँडीच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करून असुरक्षित कृत्रिम रंग आढळून आल्यानंतर अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागानं हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा -

  1. दूषित अन्न खाल्ल्यानं दरवर्षी होतो 4 लाख लोकांचा मृत्यू, जगभरात आज साजरा होतोय 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' - World Food Safety Day 2024
  2. शोरमा खाल्ल्यानं तरुणाचा मृत्यू; 12 जणांना विषबाधा, पोलिसांनी 2 विक्रेत्यांना ठोकल्या बेड्या - Mumbai Youth Died Eating Shawarma
  3. Police Trainees Suffer Food Poison : धुळ्यात 70 प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात केलं दाखल

Last Updated : Jun 25, 2024, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.