ETV Bharat / bharat

काय सांगता! सनी लिओनीला व्हायचंय पोलीस? हॉल तिकीट पाहून अधिकारीही चक्रावले - up constable recruitment exam

Actress Sunny Leone Admit Card : उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षेच्या एका प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा फोटो आणि नाव आहे. हे प्रवेशपत्र सोशल मीडियात चांगलंच व्हायरल झालंय. कोणीतरी गैरप्रकार घडवण्यासाठी सनी लिओनीच्या नावानं फॉर्म भरल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

Actress Sunny Leone Admit Card
Actress Sunny Leone Admit Card
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 12:43 PM IST

कन्नौज (उत्तर प्रदेश) Actress Sunny Leone Admit Card : उत्तर प्रदेशातील पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी कन्नौज जिल्ह्यातील पोलीस भरती परीक्षेला बसलेल्या एका उमेदवाराचं प्रवेशपत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. या प्रवेशपत्राबाबत अधिकारी चिंतेत असतानाच हे प्रवेशपत्र सगळीकडं चर्चेचा विषय ठरलंय. त्याला कारणही तसंच आहे. कारण हे प्रवेशपत्र चक्क सनी लिओनीचं असल्याचं निदर्शनास आलंय. इतकच नव्हे तर यावर तिचा फोटोही छापण्यात आलाय.

सनी लिओनीचा फोटो आणि नाव असलेलं प्रवेशपत्र

नेमकं प्रकरण आहे तरी काय : हे प्रकरण उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील तिरवा शहर परिसरातील एका महाविद्यालयाशी संबंधित आहे. तिथं पोलीस कॉन्स्टेबल भरतीची परीक्षा घेतली जात होती. त्याच परीक्षा केंद्रावर एका परिक्षार्थीच्या प्रवेशपत्रावर चक्क सिनेस्टार सनी लिओनीचा फोटो छापण्यात आला होता. प्रवेशपत्रावर सनी लिओनीच्या फोटोमुळं कोणीतरी हे प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल केलं. हे प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच ते राज्यात नव्हे तर देशात वाऱ्यासारखं पसरलं.

मुळ परिक्षार्थी विद्यार्थ्याला बसला फटका : प्रवेशपत्रावर लिहिलेल्या क्रमांकावर फोनवरुन माहिती घेतली असता, संबंधित विद्यार्थ्यानं लोकसेवा केंद्रातून फॉर्म भरल्याचं सांगितलं. पण तो फोटो कसा बदलला याची त्याला माहिती नाही. हा फोटो बदलल्यामुळं तो परीक्षेलाही बसू शकला नाही. या प्रवेशपत्रावर नमूद केलेला पत्ता मुंबईचा आहे. तर नोंदणी करताना गृहजिल्हा कन्नौज असा उल्लेख करण्यात आला होता. या प्रवेशपत्रावर एकही परिक्षार्थी परीक्षेला बसला नसल्याचं संबंधित महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

प्रकरणाची गांभिर्यानं चौकशी सुरु : स्थानिक अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सांगितलं की, या प्रवेशपत्रात एडिटिंग करण्यात आलं असून या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास सुरु आहे. असं कृत्य करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. कन्नौज जिल्ह्यात 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा आहे. यात पहिल्या दिवशी 9464 उमेदवारांनी 10 परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिलीय.

हेही वाचा :

  1. परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्याला यूपी एटीएसनं केली अटक; आयएसआयसाठी काम केल्याचा आरोप
  2. अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! आता बसस्थानकावरच होणार कमी खर्चात राहण्याची सोय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.