ETV Bharat / bharat

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; चालक ठार - तेजस्वी यादव कार अपघात

Tejashwi Yadav Convoy Accident : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात गाडीच्या चालकाचा जागीच मृत्यू झालाय. लोकसभा निवडणुकीपूर्वी तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये 'जनविश्वास यात्रा' सुरू होती. त्याचवेळी हा भीषण अपघात झालाय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 8:52 AM IST

Updated : Feb 27, 2024, 9:11 AM IST

पूर्णिया Tejashwi Yadav Convoy Accident : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या 'जनविश्वास यात्रे'दरम्यान झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. ही घटना पूर्णियाच्या मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील बेलौरी चौकात सोमवारी रात्री उशिरा घडली. तेजस्वी यादव यांच्या ताफ्याला सुरक्षा देत असलेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात एस्कॉर्ट गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक पोलीस गंभीर जखमी झाले.

कटिहारला रवाना झाला होता ताफा : तेजस्वी यादव यांचा ताफा पूर्णियाहून कटिहारला जात होता. याचवेळी या ताफ्यातील एका गाडीचा भीषण अपघात झाला. घटनेनंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातात एस्कॉर्ट गाडीच्या चालकाचा मृत्यू झालाय. या भीषण अपघातात अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून, त्यांना लगेच रुग्णालयात भरती करण्यात आलंय. या घटनेची माहिती देताना पोलीस उपअधीक्षक पुष्कर कुमार यांनी सांगितलं की, "ताफा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना कटिहार सीमेपर्यंत सोडण्यासाठी जात असताना, कटिहारकडून पूर्णियाच्या दिशेनं येणाऱ्या गाडीला ताफ्यातील एका गाडीनं बेलौरी चौकाजवळ धडक दिली. मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झालाय."

एस्कॉर्ट गाडीच्या चालकाचा जागीच मृत्यू झालाय, तर सुमारे अर्धा डझन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर पूर्णियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत - पुष्कर कुमार, पोलीस अपअधीक्षक

जखमी पोलिसांवर उपचार सुरू : तेजस्वी यादव यांच्या ताफ्याला एस्कॉर्ट करत असताना भीषण अपघात झाला. या घटनेनंतरही तेजस्वी यादव अपघातस्थळी थांबले होते. यावेळी त्यांनी मदत करत जखमींना रुग्णालयात पाठवलं. त्यानंतर यादव हे पुढं कटिहारला रवाना झाले. घटनेची माहिती मिळताच पूर्णियाचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमी पोलिसांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलंय. अपघात झालेल्या गाडीमध्ये ५ जण प्रवास करत होते.

हेही वाचा - बिहारमध्ये भीषण अपघात; दुचाकीला धडक देऊन स्कॉर्पिओची ट्रकला धडक, 9 जणांचा मृत्यू

Last Updated : Feb 27, 2024, 9:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.