नवी दिल्ली : भाजपाच्या नेत्या बांसूरी स्वराज यांनी दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर एका मुलाखतीत आरोप केले. त्यामुळे सत्येंद्र जैन यांनी भाजपा खासदार बांसूरी स्वराज यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. आपली प्रतिमा मलिन केल्याचा आरोप सत्येंद्र जैन यांनी केला आहे. यासाठी त्यांनी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयात धाव घेतली आहे.
AAP leader Satyendar Jain files defamation case against BJP MP Bansuri Swaraj
— ANI Digital (@ani_digital) December 10, 2024
Read @ANI Story | https://t.co/o1jQ2QHBpb#defamationcase #BansuriSwaraj #SatyendarJain pic.twitter.com/8fZNGp3bf7
बांसूरी स्वराज यांच्याविरोधात मानहानीची तक्रार : दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांनी भाजपा खासदार बांसूरी स्वराज यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली. एका मुलाखतीत बांसूरी स्वराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सत्येंद्र जैन यांची प्रतिमा खराब झाल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत बांसूरी स्वराज यांनी 5 ऑक्टोबर 2023 ला एका मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सत्येंद्र जैन यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याची नाणी जप्त केल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या मुलाखतीत बांसूरी स्वराज यांनी कोणताही पुरावा नसतानाही बदनामीकारक विधानं केल्याचा आरोप सत्येंद्र जैन यांनी केला. ही मुलाखत लाखो नागरिकांनी पाहिली आणि सोशल माध्यमांवर शेयर केल्याचा आरोप सत्येंद्र जैन यांनी केला.
काय केले होते बांसूरी स्वराज यांनी आरोप : भाजपाच्या नेत्या बांसूरी स्वराज यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आम आदमी पक्षाचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या मुलाखतीत बांसूरी स्वराज यांनी माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरातून 3 कोटी रुपये रोख, 1.8 किलो सोनं आणि 133 सोन्याची नाणी सापडल्याचा दावा त्यांनी केल्याचा आरोप सत्येंद्र जैन यांनी केला. त्यामुळे सत्येंद्र जैन यांनी भाजपा नेत्या बांसूरी स्वराज यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केल्याची माहिती त्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
हेही वाचा :
- Satyendar Jain Get Bail : आपचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर, पण दिल्ली सोडून जाता येणार नाही
- Sisodia Jain Resign : मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचा मंत्रिपदाचा राजीनामा; सिसोदियांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
- Sukesh Letter To Delhi LG : 'केजरीवाल आणि सत्येंद्र जैन मला धमकावत आहेत' - सुकेश चंद्रशेखर