नवी दिल्ली AAP Leader Atishi Hospitalized : राजधानी दिल्लीला हक्काचं पाणी मिळावं म्हणून जल सत्याग्रहावर बसलेल्या जलमंत्री आतिशी यांची प्रकृती मंगळवारी सकाळी खालावली. त्यानंतर मंत्री आतिशी यांना लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात ( LNJP ) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपोषणाच्या चौथ्या दिवशी सोमवारी लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयातील डॉक्टरांनी मंत्री आतिशीच्या प्रकृतीची तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी मंत्री आतिशी यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी सोमवारी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. आज सकाळी मंत्री आतिशी यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
#WATCH | Delhi Water Minister Atishi being taken to LNJP hospital due to deteriorating health.
— ANI (@ANI) June 24, 2024
Atishi has been on an indefinite hunger strike since the last four days claiming that Haryana is not releasing Delhi's share of water. pic.twitter.com/BZtG4o9ThS
मंत्री आतिशी यांना केलं रुग्णालयात दाखल : दिल्लीला पाणी मिळावं यासाठी मंत्री आतिशी यांनी अनिश्चित काळासाठी भोगल इथं जल सत्याग्रह सुरू केला आहे. मात्र सोमवारी रात्री त्यांची शुगर लेव्हल खालावली. आतिशी यांची शुगर लेव्हल सोमवारी रात्री 43 आणि मंगळवारी पहाटे 3 वाजता 36 पर्यंत खाली घसरली. मंत्री आतिशी मागील पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यामुळे काहीही न खाल्ल्यामुळे मंत्री आतिशी यांची प्रकृती खालावली आहे. हरियाणाकडून दिल्लीच्या वाट्याचं पाणी सोडावं या मागणीसाठी मंत्री आतिशी यांनी 21 जूनपासून उपोषण सुरू केलं. उपोषणाच्या चार दिवसात मंत्री आतिशी यांचं वजन 2.2 किलोनं कमी झालं.
#WATCH | Delhi Water Minister Atishi brought to LNJP Hospital as her health deteriorates.
— ANI (@ANI) June 24, 2024
Atishi has been on an indefinite hunger strike for the last four days claiming that Haryana is not releasing Delhi's share of water. pic.twitter.com/Txv2IrKfZI
दिल्लीला हक्काचं पाणी मिळण्यासाठी उपोषण : दिल्लीला हक्काचं पाणी मिळावं या मागणीसाठी जलमंत्री आतिशी यांनी अनिश्चित काळासाठी जल सत्याग्रह सुरु केला. दिल्लीतील भोगल इथं त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं. 28 लाख दिल्लीकरांचं हरियाणात जाणारं हक्काचं पाणी मिळावं, यासाठी मंत्री आतिशी यांनी हे उपोषण सुरू केलं. उपोषणापूर्वी त्यांचं वजन 65.8 किलो होतं. मात्र उपोषणाच्या 4थ्या दिवशी त्यांचं वजन 63.6 किलो झालं. अवघ्या चार दिवसात त्यांचं वजन 2.2 किलोनं घटलं. प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला एलएनजेपी डॉक्टरांनी दिल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
#WATCH | Delhi Health Minister Saurabh Bharadwaj says, " her blood sugar levels had been dropping from the night. when we submitted her blood sample, her sugar levels came out to be 46. when we checked her sugar levels from a portable machine, her sugar levels came out to be 36...… https://t.co/CCFk08SPvB pic.twitter.com/Bbe6fNcuKr
— ANI (@ANI) June 24, 2024
हेही वाचा :
- अरविंद केजरीवालांच्या आणखी एका मंत्र्याला नोटीस; भाजपानं केली होती निवडणूक आयोगाकडं तक्रार - Election Commission Notice to AAP
- आपच्या आणखी चार नेत्यांना अटक होणार, भाजपाकडून मला ऑफर... आतिशी यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप - Aap minister Atishi
- अरविंद केजरीवालनंतर गुन्हे शाखेचे पथक पोहोचले आतिशींच्या घरी, आमदारांच्या घोडेबाजारप्रकरणी बजावणार नोटीस