नवी दिल्ली Chandigarh Mayor Poll : चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपानं हेराफेरी केल्याच्या आरोपावरुन आम आदमी पक्षाच्या वतीनं आज भाजपाच्या मुख्यलयावर आंदोलन करण्यात येणार आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आम आदमी पक्षाच्या वतीनं भाजपाच्या मुख्यालयावर आंदोलन करण्यात येणार असल्यानं दिल्लीत तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
भाजपाच्या मुख्यालयासमोर आंदोलन : चंदीगड इथल्या महापौर निवडणुकीत आम आदमी पक्षाचे जास्त मतदार असूनही पक्षाला हार मानावी लागली होती. त्यामुळं भाजपाचा महापौर निवडून आला. मात्र या निवडणुकीत भाजपानं हेराफेरी केल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्याचा एक व्हडिओ जारी करण्यात आला होता. त्यामध्ये निवडणूक अधिकारी मतांमध्ये हेराफेरी करत असल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पक्षाच्या वतीनं आज भाजपाच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
अरविंद केजरीवाल यांची ईडी चौकशीला दांडी : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचं समन्स दिलं होतं. मात्र आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ईडी चौकशीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती त्यांच्या वतीनं देण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवा आणि भगवंत मान हे आम आदमी पक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या भाजपा मुख्यालयासमोरच्या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडी चौकशीकडं पाठ फिरवल्याचं स्पष्ट होत आहे.
सिंघू सीमेवर तगडी सुरक्षा : चंदीगड महापौर निवडणुकीच्या निषेधार्थ आज आम आदमी पक्षाच्या वतीनं भाजपाच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळं दिल्लीत मोठ्या प्रमाणात आंदोलक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं पोलिसांनी भाजपाच्या कार्यालयासमोर तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. त्यासह सिंघू सीमेवरही मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीत येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी सुरू आहे. डीडीयू मार्ग आणि विष्णू दिगंबर मार्गावरही तगडी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा :