नवी दिल्ली : दिल्लीच्या ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीनं द्रव पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच ताब्यात घेतलं.
पदयात्रेदरम्यान फेकले द्रव पदार्थ : राजधानी दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरात पदयात्रेदरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने द्रव पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सध्या रोज प्रचार करत आहेत. या पदयात्रेदरम्यान आज ग्रेटर कैलास येथे केजरीवाल यांच्यावर द्रव पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केला.
#WATCH | A person tried to throw a liquid on former Delhi CM and AAP National Convenor Arvind Kejriwal during his padyatra in Delhi's Greater Kailash area.
— ANI (@ANI) November 30, 2024
The person was later held by his security staff. pic.twitter.com/9c9MhzLEzj
मालवीय नगर परिसरात अरविंद केजरीवाल यांची पदयात्रा सुरू होती. सायंकाळी ५.५० वाजता ते लोकांशी हस्तांदोलन करत असताना अचानक अशोक झा नावाच्या व्यक्तीनं अरविंद केजरीवाल यांच्यावर पाणी फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस कर्मचारी जवळच असल्याने संबंधित व्यक्ती लगेच पकडला गेला. त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. तो व्यक्ती खानापूर आगारात बस मार्शल म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. - दिल्ली पोलीस
During Arvind Kejriwal's Padyatra under Malviya Nagar PS area, at around 05:50 PM, while shaking hands with the public, suddenly, a person namely Ashok Jha attempted to throw water on Arvind Kejriwal, but he was immediately caught as the police staff was nearby along with ropes.… https://t.co/c1eOFtGczL pic.twitter.com/aqHvRm2Tkt
— ANI (@ANI) November 30, 2024
'आप'चा भाजपावर आरोप : अरविंद केजरीवाल यांच्यावरील द्रव हल्ल्याबाबत आता भाजपा आणि 'आप'मध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या घटनेवरुन 'आप'नं भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. हल्ल्याबाबत मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, "भाजपा नेते सर्व राज्यांमध्ये सभा घेतात, त्यांच्यावर कधीही हल्ला होत नाही. अरविंद केजरीवाल यांच्यावर सातत्यानं हल्ले होत आहेत. नांगलोई येथेही त्यांच्यावर हल्ला केला. तसंच छतरपूरमध्येही त्यांच्यावर हल्ला झाला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे आणि केंद्र सरकार आणि गृहमंत्री काहीही करत नाहीत."
दिल्लीत राजकीय वादंग : दिल्ली विधानसभेच्या निवडणुका 2025 मध्ये होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते हे प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरत आहेत. सध्या दिल्लीत जोरदार थंडी सुटली आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या द्रव पदार्थ हल्ल्यामुळं दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे.
हेही वाचा : पुन्हा एका नव्या आजारानं काढलं डोकं वर; दिल्लीत आढळला जपानी एन्सेफलायटीसचा पहिला रुग्ण, देशभर खळबळ