हैदराबाद : फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक दुचाकी जळून खाक झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना रविवारी सुलतानबाजार परिसरातील हनुमान टेकडी इथं घडली. या घटनेत फटाका दुकानाशेजारील दुकानही जळून खाक झाल्यानं मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र औन दिवाळीत फटाक्याच्या दुकानाला आग लागल्यानं नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. या घटनेत एक महिला जखमी झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हनुमान टेकडी परिसरातील दुकानाला भीषण आग : दिवाळीची सगळीकडं मोठा जल्लोष सुरू आहे. दिवाळीच्या जल्लोषासाठी शहरात फटाक्यांची दुकानं थाटण्यात आली आहेत. हनुमान टेकडी इथल्या बाजारात गुरविंदर सिंग यांनी पारस नावानं फटाक्याचं दुकान थाटलं आहे. मात्र या दुकानात रविवारी अचानक आग लागल्यानं मोठी खळबळ उडाली. या घटनेत मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. रविवार असल्यानं बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं पुढील अनर्थ टळला.
आगीमुळे दहा दुचाकी जळून खाक : रविवारी नागरिक दिवाळीसाठी फटाके खरेदी करताना पारस या दुकानातील फटाके अचानक फुटायला सुरुवात झाली. यावेळी दुकानातील फटाके एकापाठोपाठ एक फुटायला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन पळापळ केली. ही आग शेजारीच्या दुकानामध्येही पसरली. त्यामुळे या दुकानातील काही उपकरणं जळून खाक झाली. या घटनेत एक महिला आणि दुकानातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या आगीत दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, दुकानात ठिणगी पडल्यामुळे ही आग लागली. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या फटाक्याच्या दुकानाला परवानगी नसल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.
हेही वाचा :