जयपूर : तब्बल 150 फूट बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकल्याला मागील 55 तासांपासून बचावण्यासाठी कार्य सुरू होतं. मात्र अखेर या चिमुकल्याला बाहेर काढलं असलं, तरी त्याला बचावण्यात बचाव पथकाला अपयश आलं आहे. तब्बल 55 तासांच्या अथक मोहिमेनंतरही त्याला बाहेर काढल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हा चिमुकला राजस्थानमधील दौसा इथल्या कालीखड गावात सोमवारी खेळताना बोअरवेलमध्ये पडला होता. त्यानंतर त्याला बचावण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात आली.
150 फूट बोअरवेलमध्ये पडला चिमुकला : राजस्थानमधील दौसा इथं सोमवारपासून 150 फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या 5 वर्षीय चिमकल्याला बुधवारी रात्री 55 तासांच्या बचाव मोहिमेनंतर बाहेर काढलं. मात्र या चिमुकल्याला बाहेर काढल्यानंतर त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं. हा चिमुकला 9 डिसेंबरला खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला. चिमुकला बोअरवेलमध्ये पडल्यानंतर मोठी खळबळ उडाली. त्याला बचावण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली. सोमवारी दुपारी 3 वाजता कालीखड गावात ही घटना घडल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं.
बेशुद्ध अवस्थेत चिमुकल्याला काढलं बाहेर : बुधवारी रात्री बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला बाहेर काढण्यात आलं. त्याला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दौसा येथील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यानं सांगितलं की, चिमुकल्याला बचावण्याचा पूर्ण प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला. मात्र त्याला बचावण्यात यश आलं नाही. आम्ही दोनदा ईसीजी केला पण चिमुकला मृत झाल्याचं स्पष्ट झालं" असे दौसाचे सीएमओ म्हणाले. जिल्हाधिकारी देवेंद्र कुमार यांनी यावेळी घटनेविषयी माहिती दिली. अधिकाऱ्यांनी बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले, मात्र त्यात यश आलं नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :