भावनगर Doctor Ganesh Baraiya : गुजरातमधील भावनगरमध्ये राहणारा गणेश बरैय्या नुकताच डॉक्टर झालाय. जगातील सर्वात तरुण डॉक्टर म्हणून गणेश बरैयाचं वर्णन केलं जातंय. 2018 मध्ये त्यानं NEET परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र, 'मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया'नं त्याची उंची फक्त तीन फूट असल्यानं प्रवेश नाकारला होता. एमसीआयच्या निर्णयाविरोधात गणेशनं गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र त्याला उच्च न्ययालयात देखील दिलासा मिळाला नाही. त्यानंतर गणेशनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं 'मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया'चा निर्णय रद्द केला. त्यामुळं 2019 साली गणेशला MBBS मध्ये प्रवेश मिळाला. आता गणेश गुजरातमधील सरकारी रुग्णालयात इंटर्नशिप करत आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी एमबीबीएस पूर्ण : डॉ. गणेश बरैय्याची उंची केवळ 3 फूट आहे. बारावी सायन्स पूर्ण केल्यानंतर डॉक्टर पदवी मिळविण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यानं एमबीबीएस पूर्ण केलं असून सध्या इंटर्नशिप करत आहे. भावनगर जिल्ह्यातील तळाजा तालुक्यातील गोरखी गावात राहणारे कोळी समाजातील विठ्ठलभाई बरैया यांना 7 मुली आणि 2 मुलं आहेत. ज्यामध्ये 23 वर्षीय डॉ. गणेश बरैय्याचा आठवा क्रमांक आहे. तो सध्या, सर टी हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत आहेत. तर त्याचा लहान भाऊही शिकत आहे.
''गोरखी गावच्या प्राथमिक शाळेत मी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर तळाजा येथील नीळकंठ विद्यापीठातून 87 टक्के गुण मिळवून 12वी उत्तीर्ण झालो. माला NEET परीक्षेत 720 पैकी 233 गुण मिळाले. मात्र, मेडिकल कौन्सिलनं नकार दिल्यानंतर माला मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं."- डॉ. गणेश बरैय्या
सर्वोच्च न्यायालयात आव्हान : '12वी उत्तीर्ण झाल्यानंतर मी NEET परीक्षा दिली. पण माझी उंची कमी असल्यानं मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानं माझा अर्ज नाकारला. माझी उंची कमी असल्यानं मी आपत्कालीन केसेस हाताळू शकणार नाही, असं त्यांचं मत होतं. मग मी माझे मुख्याध्यापक डॉ. दलपत भाई कटारिया, रायवतसिंग सरवैया, खासदार भारतीबेन शायल यांच्या पाठिंब्यानं माजी शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा तसंच तत्कालीन जिल्हाधिकारी हर्षद पटेल यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला, मात्र आमचा उच्च न्यायालयात पराभव झाला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं'.
2019 मध्ये 'एमबीबीएस'ला प्रवेश : ''2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला. त्यानंतर मी 2019 मध्ये एमबीबीएसमध्ये प्रवेश घेऊ शकलो. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, 2018 MBBS ची प्रवेश प्रकिया पूर्ण झाल्यानं मला 2019 मध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल. यानंतर मी भावनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यामुळं आज माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं," असं गणेश म्हणाला.
हे वाचलंत का :