Asawari Joshi Joined NCP : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश - आमदार सुनील शेळके

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 7, 2022, 3:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी ( Actress Asawari Joshi ) व स्वागता शहा ( Actress Swagata Shaha ) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM AJit Pawar ) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षप्रवेश करणार्‍यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र पुढे नेण्याचे काम पवारसाहेब करत आहेत असेही अजित पवार म्हणाले. प्रवेश द्यायचा आणि संपर्क ठेवायचा नाही असं होता कामा नये. शिवाय पक्षाला बाधा निर्माण होईल असे काम करु नये अशी सूचना अजित पवार यांनी व्यक्त केली. आमदार सुनील शेळके ( MLA Sunil Shelke ) यांच्यासारखा उमदा कार्यकर्ता आम्हाला मावळमध्ये भेटला. लोकांनी आपली जबाबदारी पार पाडली आता आमची कामे करण्याची जबाबदारी आहे असेही अजित पवार म्हणाले. राज्यातील तीन हजार कलाकारांना आपण राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या ( Rashtrawadi Welfare Trust ) माध्यमातून मदत दिली आहे. शिवाय तमाशा कलावंतांनाही मदत दिली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.