Viral video - वर्ध्यात नालीच्या पाण्यात धुत होता भाजीपाला - नाल्यातील पाण्यात भाजी धुताना भाजी विक्रेता
🎬 Watch Now: Feature Video
वर्धा : राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असतांना नाल्या तुडुंब भरून वाहत आहे. एक भाजी विक्रेता वर्धा येथील एका नालीत भाजी धुवत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ हिंगणघाट येथील शहरातील मनसे चौकातील असल्याच दिसून येत आहे. हिरवा भाजीपाला हा चक्क नालीच्या पाण्याने धुताना एकाने व्हिडिओ काढत, सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) केला. या पद्धतीने नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यक्तीवर कारवाईची मागणी केल्या जात आहे.