Prakash Mahajan MNS Vidarbha : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'विदर्भात' मोठी संधी; प्रकाश महाजनांचं वक्तव्य - प्रकाश महाजनांचं वक्तव्य
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर- विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खूप मोठी संधी (chance for Maharashtra Navnirman Sena in Vidarbha ) आहे, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन (MNS leader Prakash Mahajan) यांनी केलेला आहे. विदर्भात पक्षाची मोर्चे बांधणी आणि कार्यकर्त्यांची फौज उभी करण्याकरिता राज ठाकरे पुढील पाच दिवस नागपूर अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार (Maharashtra Navnirman Sena in Vidarbha) आहे. या दरम्यान ते महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची मोर्चे बांधणी करणार आहेत. राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलं असून याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसेल, असा दावा प्रकाश महाजन यांनी केला (Prakash Mahajan Statement) आहे.