Kishor Patil Criticized Kirit Somaiya : 'सकाळपासून टीव्हीवर बसलेला बोबड्या म्हणजेच किरीट सोमैया' - आमदार किशोर पाटील

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 30, 2022, 6:08 PM IST

जळगाव - सर्व प्रयत्न करूनही महाविकास आघाडी सरकार पडत नसल्याने भाजपाने आता राणा दाम्पत्य, राज ठाणे, आणि राणे यांचासह सकाळपासून टिव्हीवर दिसणारे बोबड्या म्हणजेच किरीट सोमैयावर वापर करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला. अशी टीका शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ( Kishor Patil Criticized Kirit Somaiya ) पाचोरा येथे झालेल्या शिवसंपर्क अभियानात केली ( shiv sampak abhayan at jalgaon ) आहे. शिव संपर्क अभियान निमित्ताने पाचोऱ्यात शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मेळाव्यास पाणी पुरवठा स्वछता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, संपर्क प्रमुख संजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होता. खासदार झाल्यापासून यांनी कोणत्याही प्रकारची विकास कामे मतदार संघात केली नाहीत, यांना मोदी सरकारकडून विकास काम करण्यासाठी गेल्या तीन वर्षात एकही रुपया मिळू शकला नसल्याने आता हे विकास कामांच्या ऐवजी रिकाम्या गोष्टी समोर आणत आहेत. विकास कामे करता आली नसल्याने त्यांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे म्हणून खासदार गिरना नदी परिक्रमा करीत आहेत असा आरोप ही आमदार किशोर पाटील यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.