Sanjay More : उदय सामंत यांच्या वाहनावरील हल्ला प्रकरण; घटनेनंतर संजय मोरे यांनी 'ही' दिली होती प्रतिक्रिया - शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 3, 2022, 12:38 PM IST

Updated : Aug 3, 2022, 1:53 PM IST

पुणे - पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा वादग्रस्त ठरला आहे. ( CM Eknath Shinde pune tour controversy ) कारण मुख्यमंत्र्याचा ताफा कात्रज चौकातून जाताना त्याच ठिकाणी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा झाली. सभेनंतर त्या ठिकाणाहून ताफा जात असताना उदय सामंत यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी हल्ला केला ( Shiv Sainiks attack on uday samant car ). ते कोण होते हे याची माहिती कळू शकली नाही. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे ( Shiv Sena City Chief Sanjay More ) यांनी घटनेचा तपास होणार असल्याचे मंगळवारी सांगितले. असा हल्ला शिवसैनिक करणार नाही. दोन्ही नेत्यांचा दौरा असल्यामुळे आपल्याला कुठेही गडबड करायची नाही आपण आक्रमक व्हायचे नाही असे आदेश सर्व शिवसैनिकांना दिले होते असे संजय मोरे म्हणाले. मीही त्या संदर्भात माहिती घेईन ते नक्की शिवसैनिकच होते? का आणखी कोण होते? याची माहिती मी घेईनच असे यावेळी शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.
Last Updated : Aug 3, 2022, 1:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.