World Environment Day : नांदेडमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी रोलर स्केटींग रॅलीचे आयोजन - पर्यावरण संवर्धनासाठी रोलर स्केटींग रॅलीचे आयोजन
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड जिल्हा रोलर स्केटींग असोसिएशन तर्फे रोलर स्केटींग शालेय खेळाडू मुला-मुलींचे रॅलीचे आयोजित करण्यात आले होते. महापौर जयश्री पावडे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. गांधी पुतळापासुन या रॅलीची सुरुवात करण्यात आली. यात 100 शालेय चिमुकल्यांनी विविध संदेश देणारे फलक घेऊन पर्यावरण संदर्भात जनजागृती केली.