Pune Mango Eating Competition : पुण्यात चिमुकल्यांनी मारला हापुस आंब्यांवर ताव, आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा, पाहा Video
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - आंबा ( Mango ) म्हटले की लहानांपासून मोठ्यापर्यंत ते अगदी ज्येष्ठांच्या ही तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. फळांचा राजा अशी आंब्याची ओळख. उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रत्येकाला आंबा आकर्षित करतो. आंबा हा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वाचे आवडत फळ. या आंब्यांचा मधूर रस चाखण्याची खाण्याची मज्जा लहानग्यांना करता यावी यासाठी पुण्यात चवदार, रसाळ, पिवळेधम्मक हापूस आंबे खाण्याची स्पर्धा ( Pune Mango Eating Competition ) भरवण्यात आली होती. मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा बंद होती मात्र यावर्षी ही स्पर्धा मोठ्या उत्साहाने पार पडली. या स्पर्धेच्या निमित्ताने रसाळ, चवदार, पिवळेधम्मक हापूस आंबे इवल्याशा हातांमध्ये पकडण्याची कसरत लहान मुलांमध्ये पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये पलक निखिल मालुसुरे या चिमुकलीने 3 मिनिटांत 3 आंबे खाऊन प्रथम क्रमांक पटकवला. यानंतर तिला या स्पर्धेचे आयोजकानी तिला आंब्याची पेटी बक्षिस म्हणून दिली.