Nana Patole Enquiry : पंतप्रधान मोदींविरोधातील 'ते' वक्तव्य भोवणार.. नाना पटोलेंच्या चौकशीचे आदेश - भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाणा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना (BJYP Mumbai President Tejindarsingh Tiwana ) यांनी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात ( Marine Drive Police Station ) तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी डीसीपी कार्यालय आणि पोलिस आयुक्तांकडे नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. परंतु नाना पटोले यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने सर्व बाजूंनी हताश झालेल्या तिवाना यांनी न्यायालयात धाव घेत अतिरिक्त महानगर दंडाधिकारी, शिवडी यांच्याकडे कलम १५३ (ब), ५०५, ५०५ (२), ५०४,५०६ अन्वये याचिका दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आज न्यायालयाने भोईवाडा पोलीस स्टेशनला ( Bhoiwada Police Station Mumbai ) याचिकेत नोंदवलेल्या सर्व कलमांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. २६ मे २०२२ रोजी न्यायालयासमोर त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले, "महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय टिप्पणी ( Nana Patole Controversial Statement Narendra Modi ) केली. देशाचे पंतप्रधानपद हे घटनात्मक पद आहे, पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. पंतप्रधानांविरोधात अपमानास्पद भाषा वापरणे हा देशातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की सत्याचा पराभव होऊ शकत नाही. शब्दांनी बोलणाऱ्या नानासारख्या नेत्यांसाठी हा धडा आहे.