Rajyasabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीचा भाजपाकडून उपराजधानीत जल्लोष - राज्यसभा निवडणुकीत भाजपाची तीन उमेदवार विजयी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - अटीतटीच्या लढतीत भाजपाचे तीन खासदार राज्यसभा निवडणुकीत विजयी झाल्याने उपराजधानी नागपुरात जल्लोष करण्यात ( bjp celebration three candidate win rajyasabha election ) आला. भाजपाच्या विदर्भ विभागीय कार्यालयासमोर कार्यकर्ते एकत्र येत ढोल आणि फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी आमदार कृष्णा खोपडे हे स्वत: नाचत आनंद व्यक्त करतांना दिसून आलेत. भाजपा कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून, तर महिला कार्यकर्त्यांनी यावेळी पारंपारिक फुगडी खेळून आनंद साजरा केला. यावेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस विजयाचा जयघोष देखील करण्यात आला. जय श्री रामचे नारे देत विजयाचा जल्लोष आनंदात साजरा करण्यात आला.