Musical Fountain In Nagpur : म्युझिकल फाऊंटनचा 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान ‘ट्रायल शो'; नागपूरकरांना घेता येईल आनंद - Nagpur Futala Lake
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - नागपूरच्या अप्रतिम सौन्दर्यात भर घालणाऱ्या फुटाळा तलावात ( Futala Lake Nagpur ) जागतिक दर्जाचे पाण्यावर तरंगणारे म्युझिकल फाऊंटन तयार करण्यात ( Musical Fountain in Futala Lake, Nagpur )आले आहे. गेल्या महिन्यात या फाउंटनचा पहिला ट्रायल शो झाल्यानंतर आता 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान ‘ट्रायल शो’ होणार, असून नागपूरकरांना याचा येईल आनंद घेता येणार आहे. फुटाळा तलावातील पाण्यात सुमधूर गीतांच्या तालावर थुईथुई नाचणारा, उचंच उच फवारे उडवणारा, इंद्रधनुषी रंगाची उधळण करणारा, पाण्याच्या अप्रतिम ‘स्क्रीन’वर नागपूरच्या इतिहास झलक दाखवणारा,अंगावर रोमांच उभे करणारा फाउंटन आणि लाईट शो आता प्रत्येकाला बघायला मिळणार आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने ( MP Cultural Festival Committee Nagpur ) येत्या, 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान शहराच्या सौंदर्यात भर घालणा-या फुटाळा तलावावरील या अतिशय देखणा, अप्रतिम, असा म्युझिकल फाउंटन लाईटशोचे दरदिवशी रात्री 7 व 9 वाजता असे दोन ‘ट्रायल शो’ आयोजित करण्यात आले आहेत.