Mukesh Ambani at Tirumala Shrivari Seva मुकेश अंबानींनी घेतले भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन, गजराजांना स्वहस्ते दिले भोजन - मुकेश अंबानींनी तिरुमला मंदिरात शिवरात्री सेवा
🎬 Watch Now: Feature Video
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ( Reliance Industries Chairman Mukesh Ambani ) यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती देवस्थान मंदिरात भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन ( Mukesh Ambani at Tirumala Shrivari Seva ) घेतले. या भेटीत त्यांच्यासोबत त्यांची धाकटी सून ( धाकटा मुलगा अनंत अंबानी याची भावी पत्नी) राधिका मर्चंट ही देखील होती. शुक्रवारी सकाळी अंबानी आपल्या कुटुंबीयांसह अभिषेक आणि निजपद दर्शन सेवेत सहभागी झाले होते. तिरुमला तिरुपती देवस्थानम ( TTD ) चे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी यांनी अंबानींचे स्वागत केले आणि दर्शनाची व्यवस्था केली. दर्शनानंतर रंगनायक मंडपात विद्वानांनी वैदिक आशीर्वाद दिले. मुकेश अंबानी यावेळी १.५ कोटी रुपये देणगीचा धनादेश संबंधितांना सुपूर्द केला. यावेळी मुकेश अंबानी यांनी येथील गजराजांना स्वतःच्या हाताने भोजनही खाऊ घातले. गजराजाकडून त्यांनी आशीर्वादही घेतले.