Shiv Jayanti In Karad : कराडमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; महिलांनी काढली मोटरसायकल रॅली, पाहा व्हिडिओ - शिवजंयती 2022 कराड

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 3, 2022, 9:56 AM IST

कराड (सातारा) - हिंदू एकता आंदोलनाच्या सुवर्ण महोत्सवामुळे अवघे कराड शहर शिवमय ( Shiv Jayanti In Karad ) झाले. चौका-चौकांमध्ये शिव पुतळ्यांची प्रतिष्ठापना, भगव्या पताका, फुलांची सजावट, पोवाडे आणि स्फूर्ती गीतांनी संपूर्ण कराडकरांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. हिंदू एकताच्या सुवर्ण महोत्सवामुळे यंदाचा शिवजयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा होत आहे. चित्रकला, सजावट स्पर्धा आणि महिलांची मोटरसायकल रॅली ( motorcycle rally by women ) अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी महिलांनी कराड शहरातून मोटरसायकल रॅली काढली. त्यानंतर कराडचे शिवर्तीर्थ अर्थात दत्त चौकातील छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकामध्ये पाळणा म्हटला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. मंगळवारी (दि. 3) दुपारी कराड शहरात दरबार मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीत आंध्र प्रदेशातील आमदार राजा भैय्या यांच्याकडून आणण्यात आलेली 16 फुटी श्रीरामाची मुर्ती, हनुमानाची भव्य मुर्ती, छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आलेली मोटरसायकल, भगवे फेटेधारी महिलांचा सहभाग असणार आहे. दरबार मिरवणुकीनंतर विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.