Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिदीच्या समर्थनार्थ मालेगावला धरणे आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
मालेगाव (नाशिक) - वाराणशी येथील ज्ञानवापी मशीदमध्ये शिवलिंग असल्याचा दाखला देत कोर्टाने ती मशीद सील करण्याचा निर्णय दिल्यानंतर मालेगावमध्ये त्याचे पडसाद उमटले. रात्री 12 वाजता एसडीपीआय या संघटनेने धरणे आंदोलन करत मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी ( Malegaon agitation in support of Gyanvapi Masjid ) केली. रात्रीचे आंदोलन करण्याची ही पहिलीच घटना मालेगावमध्ये घडली आहे. वाराणशी येथील ज्ञानव्यापी मशिदमध्ये सर्वेक्षण केले जात असल्याचे पडसाद मालेगावात उमटले असून केंद्र सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करत एसडीपीआय या मुस्लिम संघटनेने मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महागाई, इंधन दरवाढ आणि इतर मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी मोदी सरकार मंदिर-मशिद वाद उकरून काढत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांनी केला.