Uday Samant In Guwahati : शिवसेनेचे नेते उदय सामंत गुवाहाटीत; एकनाथ शिंदेंची घेतली गळाभेट - उदय सामंत गुवाहाटीत
🎬 Watch Now: Feature Video
गुवाहाटी ( आसाम ) - शिवसेनेचे नेते, उच्चशिक्षणंत्री उदय सामंत हे गुवाहाटीत दाखल झाले आहेत. आज ( 26 जून ) सकाळपासून सामंत नॉटरिचेबल होते. मात्र, त्यानंतर त्यांच्या विमानाचे तिकीट समोर आल्याने ते गुवाहाटीला गेल्याचे स्पष्ट झालं होतं. सामंत गुवाहाटीत शिवसेनेचे बंडखोर आमदार आहेत त्या हॉटेलमध्ये पोहचले आहेत. तिथे गेल्यावर त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची गळाभेट घेतली आहे. दरम्यान, उदय सामंत हे तीन दिवस मातोश्री आणि वर्षा बंगल्यावर ठाण मांडून होते. मात्र, ते देखील शिवसेना बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाले ( uday samant meets rebel shivsena mls in guwahati ) आहेत.