Lord Mahadev : शिवभक्ताची कमाल! 1008 बेलाच्या पानांचा वापर करून साकारली महादेवाची प्रतिमा - महादेवाची प्रतिमा बेलाच्या पानांवर साकारली
🎬 Watch Now: Feature Video
श्रावण सोमवारनिमित्त 1008 बेलाच्या पानांचा वापर करून महादेवाची प्रतिमा येवल्यातील कलाकार संतोष राऊळ यांनी साकारली ( Lord Mahadev image create by 1008 Bel leaves ) . महादेवाच्या मूर्तीच्या आजूबाजूला देखील बेलाची पाने लावली असून या बेलांच्या पानावर देखील शिवशंभो, महादेवाच्या विविध प्रतिमा, नावे या कलाकाराने आपल्या हाताच्या साह्याने पेंट करून साकारली ( Lord Mahadev image Paint by hand ). कलाकार आपली कलाकारी विविध माध्यमातून नेहमी साकारत असतो. अशाच प्रकारे येवल्यातील संतोष राऊळ या कलाकाराने श्रावण महिना ( shravan month ) निमित्ताने 1008 बेलाचे पाने आणून ह्या सर्व बेलाच्या पानांना महादेवाचा आकार देऊन त्यावर कलर देऊन ध्यानस्थ महादेवाची अप्रतिम अशी प्रतिमा साकारली ( Lord Mahadev image create on Bel leaves ) . या मूर्तीच्या आजूबाजूला देखील शेकडो बेलाची पाने लावून त्यावर देखील महादेवाच्या विविध प्रतिमा, ओम नमः शिवाय, डमरू, त्रिशूल असे सर्व रेखाटले. याकरता या कलाकाराला दोन दिवसाचा कालावधी लागला आहे.