Injured Leopard Gondia : भिवखिडकीत नाल्याच्या पाइपमध्ये जखमी अवस्थेत आढळला बिबट्या; वन विभागाने केले जेरबंद - अर्जुनी भिवखिडकी बिबट्या

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 14, 2022, 9:01 PM IST

गोंदिया - जखमी अवस्थेत पुलाखालील पाइपमध्ये लपलेल्या बिबट्याला रेस्क्यू ( Rescue the leopard in Gondia ) करत वनविभागाने जीवनदान दिले आहे. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील भिवखिडकी येथे हा बिबट्या जखमी ( Injured leopard At Bhivkhidaki ) अवस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. तब्बल चार तासाच्या प्रयत्नानंतर जखमी बिबट्याला जेरबंद केले. बिबट्याला डोक्याला, पायाला आणि छातीच्या बाजूला गंभीर जखमा असल्यामुळे त्याला तातडीने नागपूर येथील गोरेवाडा वन्य प्राणी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूर येथील उपचारानंतर त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.