Car Stuck In Sea : गोव्यातील वागातोर समुद्रकिनाऱ्यावर अडकली चारचाकी गाडी, पाहा VIDEO - गोवा वाघतोर बीच गाडी अडकली बातमी
🎬 Watch Now: Feature Video

गोवा - गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर अनेकांना फिरायला, बागडायला आवडते. मात्र काही हौशी व बेशिस्त पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या कृत्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. गुरुवारी चक्क दिल्लीस्थित रहिवाशाने गोव्यातील वागातोर समुद्रकिनाऱ्यावर 4चाकी चालवण्याचा आनंद लुटला. मात्र, ही गाडी समुद्राच्या पाण्यात अडकून बसली. ललित कुमार दया, असे या पर्यटकाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच गाडीही जप्त करण्यात आली आहे.