Coal Import 2024 25 नंतर कोळसा इम्पोर्ट बंद होईल, कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी
🎬 Watch Now: Feature Video
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड WESTERN COALFIELD LIMITED या वर्षासाठी ६४ मिलीयन टन कोळशाचे उत्पादन करण्याचे टार्गेट निर्धारित करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षातील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या कामाचा आलेख बघता यावर्षी सुद्धा वेकोली आपले टार्गेट सहजतेने पूर्ण करेल अशी अपेक्षा असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपूरमध्ये आयोजित तीन दिवसीय मीनकॉन 2022 कॉन्फरन्सच्या उद्घाटनासाठी आले असता बोलत होते. गेल्या दहा वर्षाचा इतिहास बघितला तर एक बाब लक्षात येते ती म्हणजे आम्ही ऑक्टोबर महिन्यात दहा ते पंधरा मिलीयन टन कोळशाचे उत्पादन घेऊ असे टार्गेट सेट केलं जायचे. मात्र, यावर्षी ऑक्टोबर महिन्यात 24.5 मिलीयन टन कोळशाचे उत्पादन घेऊ असा टार्गेट सेट करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. देशात कोळशाचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात असून 2024 25 पासून कोळसा इम्पोर्ट करने बंद केले जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात कोळशाचा कुठे सुद्धा तुटवडा नाही. ज्यांना जितका कोळसा हवा असेल त्यांना तितका कोळसा देण्याची आमची तयारी असल्याचे कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले आहेत.